Ads

भद्रावती बाजार समितीची, वजन काट्यामध्ये गडबड करणाऱ्या कापूस व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईPunitive action by Bhadravati Bazar Samiti against cotton traders who tampered with weighing scales

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :- आज दिनांक 03/03/2024 रोज रविवारला श्री. मोहनदास हनुमान ठाकरे राहणार चिरादेवी या शेतकऱ्यांनी आपला कापूस श्री वसंता माणिक वंजारी रा. मेसा यांना विकत असताना शेतकऱ्यांच्या लक्षात आले की वजन काट्यामध्ये मध्ये फरक आहे. असे त्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना म्हटले. परंतु ते व्यापारी समजायला तयार नव्हते.Punitive action by Bhadravati Bazar Samiti against cotton traders who tampered with weighing scales
त्यांनी तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे सचिव श्री. नागेश पुनवटकर यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ बाजार समितीचे निरीक्षक श्री. संजय शेंडे लिपिक श्री. विलास पालकर यांना बोलावून मोहनदास हनुमान ठाकरे रा. चिरादेवी यांचे घरी जाऊन श्री. वसंता माणिक वंजारी रा. मेसा कापूस खरेदी करत असताना त्यांच्यावर बाजार समितीच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई करून दंड, बाजार फी, सुपरव्हिजन फी, अशी एकून रक्कम 15000/- रुपये वसूल करण्यात आले. यापुढे भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांनी खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना आपला कापूस व अन्य शेतमाल विकू नये, शेतमाल खरेदी करताना आढळल्यास, बाजार समितीच्या नियमानुसार व्यापाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल उपबाजार आवार चंदनखेडा, नंदोरी येथेच विकावा. असे आवाहन बाजार समितीचे सभापती श्री. भास्कर ताजणे, उपसभापती सौ.अश्लेषा भोयर (जीवतोडे ) सचिव नागेश पुनवटकर व बाजार समितीचे सर्व संचालक यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment