(सादिक थैम) वरोरा : तालुक्यातील एकोणा कोळसा खाणीतून कोळशाची चोरी होत असल्याची तक्रार सुरक्षा रक्षक इन्चार्जने केल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कोळसा चोरी करणारा ट्रक आणि जेसीबी मशीन जप्त केली आहे.Theft of Coal from Ekona Coal Mine
वरोरा तालुक्यात वेकोलीची एकोणा येथे कोळसा खाण असून या खाणीतून मोठ्या प्रमाणात कोळशाची चोरी होत असल्याची चर्चा फार पूर्वीपासून सुरू आहे. दरम्यान १० मार्च रोजी पहाटे ३ ते ५ वाजताच्या सुमारास सुरक्षा रक्षक पेट्रोलिंग करत असताना माती खोदकामासाठी आलेल्या जेसीपी मशीन द्वारे एका हायवा ट्रकमध्ये कोळसा भरत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत सुरक्षा इन्चार्ज ने अधिक माहिती घेतली असता हा प्रकार कोळसा चोरीचा असल्याचे उघड झाले. यामुळे सुरक्षा रक्षक इंचार्ज प्रफुल भरोसा आघात याने या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन कोळसा भरलेला हायवा ट्रक क्रमांक एम एच ४० सीडी ६९११ व पीसी मशीन जप्त करून अज्ञात आरोपी विरुद्ध ३७९, ५११ अशा विविध कलमाने गुन्हा दाखल केला आहे. तसेच चोरी गेलेला कोळसा वरोरा येथील बावणे लेआउट मधील जिजामाता वार्ड येथून एक लाख तीस हजार रुपयांचा कोळसा ताब्यात घेतला आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
0 comments:
Post a Comment