राजुरा :-जे सी आय राजुरा तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त वर्षा कोयचाडे यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक, शैक्षिणिक, क्रीड़ा क्षेत्रात उत्कृष्ट अशी कमगीरी करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दीनानिमित्त सत्कार करण्यात आला.Varsha Koychale Honored by JCI
यावेळी माजी आमदार ऍड. संजय यादवराव धोटे, श्री शिवाजी महाविद्यालय राजूराचे उपप्रचार्य प्रा.डॉ. राजेश खेराणी, जे.सी.आय.चे अध्यक्ष जाहिर लाखानी ,सचिव अंकुश चौहान यांच्या उपस्थितित वर्षा कोयचाळे यांचा सत्कार करण्यात आला.
सर्वानी खुप कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. नेसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास महाराष्ट्र अध्यक्ष बादल बेले , नागपूर विभागीय अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर, संतोष देरकर, बबलू चव्हाण, आशीष करमनकर, पूर्वा खेरकर, मयूर खेरकर , स्वतंत्रकुमार शुक्लाआदींनी सत्कार प्रसंगी शुभेच्छा दिल्या.
0 comments:
Post a Comment