Ads

सुगंधित तंबाखुसह २१लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त.

(सादिक थैम) वरोरा : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू चंद्रपुरात येत असल्याच्या गुप्त माहितीवरून चंद्रपूर एलसीबी पथकाने आज गुरुवार दि.१४ मार्च रोजी वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नंदोरी टोल नाक्यावर सापळा रचून कारवाई केली. सदर कारवाईत ५,७७,६०० रुपयांचा सुगंधी तंबाखू आणि वाहतूक करणारे वाहन असा २१ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका महिला आरोपीसह वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे.
21 lakh 77 thousand worth of goods seized including aromatic tobacco
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहे .त्याअनुशंगाने जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी त्यांच्या अधिनस्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक नेमुन त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान आज गुरुवार दि. १४ मार्च २०२४ रोजी गोपनिय माहीतीगार यांनी नागपूर येथून कार क्रमांक एम एच ३४ सीडी ८५४० या पांढऱ्या रंगाच्या कारमधून महाराष्ट्र प्रतिबंधित केलेला सुगंधित तंम्बाखूचा साठा भरुन चंद्रपुर कडे अवैधरित्या विक्रीसाठी वाहतुक करीत आहे. सदर माहिती मिळताच वरोरा पोलीस स्टेशन हद्दीतील नंदोरी टोल नाक्यावर चंद्रपूर एलसीबी पथकाने नाकाबंदी करून सापळा रचला. दरम्यान माहिती मिळालेले संशयित वाहन क्रमांक एम एच ३४ सीडी ८५४० टोल नाक्यावर येतात त्या वाहनाला अडवून त्याची झडती घेतली असता त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला ५ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा सुंगधित तंबाखू आढळून आला. यामुळे सदर तंबाखू आणि त्याच्या वाहतुकी करता वापरण्यात आलेली १५ लाख ५० हजार रुपयांची टोयोटा कंपनिची गाडी व दोन मोबाईल.
असा एकुण २१२७६०० /- रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. सदर प्रतिबंधित सुगंधित‌ तंबाखू शासनाने प्रतिबंधित केलेला असल्याने व आरोपी याची अवैधरित्या विक्रीकरीता वाहतुक करीत असता मिळून आल्याने वाहन चालक मुकेश नगिनभाई कातरानी वय ४६ वर्षे व एक महीला दोन्ही रा. वार्ड क्र. ६ नेरी (दुर्गापुर) ता.जि. चंद्रपुर यांचे विरुध्द पो.स्टे. वरोरा येथे अपराध क्रमांक २०२४ नुसार कलम ३२८,१८८,२७२,२७३,३४ भांदवी सह कलम ३० (२), २६ (२) (अ), ३, ४, ५९ (१) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच एलसीबी पथकाने पुढील कायदेशीर कारवाई करण्याकरीता जप्त मुद्देमाल व दोन्ही आरोपीला वरोरा पोलिसांच्या ताब्यात दिले.
उपरोक्त कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन , अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गदादे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी, पोहवालदार धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, प्रशांत नागोसे, दिनेश अराडे, सायबर पोलीस स्टेशन चे उमेश रोडे, पो.स्टे. वरोरा येथील महिला पोलीस शिपाई किर्ती ठेंगणे अराडे यांनी केली. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment