Ads

ए.टि.एम. फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना हरियाणा व हैद्राबाद येथून अटक

चंद्रपुर :-दिनांक ३१/०३/२०२४ रोजी फिर्यादी नामे पोउपनि अतुल कावळे, पोलीस स्टेशन, रामनगर यांनी पोस्टला तक्रार दिली की, दिनांक २८/०३/२०२४ रोजी नाईट ड्युटी ऑफिसर म्हणुन ड्युटीवर हजर असतांना नियंत्रण कक्ष येथुन माहिती मिळाली की, बंगाली कॅम्प चौक, दुर्गा माता मंदिर जवळील बँक ऑफ इंडियाचे ए. टि.एम. मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला अशा माहिती वरून बँक ऑफ इंडिया, बंगाली कॅम्पचे ए.टि.एम मध्ये जावुन पाहीले असता, ए.टि.एम. मधुन जोर-जोराने सायरनचा आवाज येत असल्याचे तसेच ए.टि.एम. मधील सीसीटिव्ही. कॅमे-यावर स्प्रे मारून कॅमे-याचे वायर तोडल्याचे दिसुन आले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, रामनगर येथे अप.क्र. अप.क्र. ३६४/२०२४ कलम ३७९, ५११ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे..

ATM The accused who tried to burst were arrested from Haryana and Hyderabad
नमुद गुन्हयाचे तपासा दररम्यान अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गाडे, यांनी तात्काळ गुन्हे शोध पथक येथील अधिकारी तसेच कर्मचारीसह घटनास्थळी खाना झाले. गुन्हे शोध पथकानी तात्काळ घटनास्थळाचे आजुबाजुच्या परिसरातील सी.सी.टि.व्हि. फुटेज चेक केले असता, एका काळया रंगाच्या कार मध्ये काही अज्ञात इसम ए. टि.एम. मधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन आले. तेव्हा पोलीस अधिक्षक सा., अपर पोलीस अधिक्षक सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सा. यांचे मार्गदर्शनात पोउपनि मधुकर सामलवार तसेच कर्मचारी यांचे पथक तयार करून अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी रवाना केले. त्यावरून पोउपनि सामलवार सा. यांचे पथक सी.सी. टि. व्हि. फुटेज पाहत काळया रंगाच्या थार गाडीचा पाठलाग करीत टोल नाके चेक करीत नागपुर, हैद्राबाद येथे जावुन थार गाडी व आरोपीतांचा शोध घेत आरोपी नामे हुसेन अली वय-२१ वर्ष, रा. पटेलवाडा, आमीरपेठ, हैद्राबाद यास ताब्यात घेवुन विचारपुस केले असता, त्यांने १) मो. आमीर उर्फ अरमान मलीक रा. हैद्राबाद, २) तस्सी उर्फ तस्लीम उदय खान, वय-२६ वर्ष, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात, राज्य हरियाणा, ३) राशीद खान, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात, राज्य- हरियाणा, ४) सल्ली उर्फ सलमान रा. भोंड, ता. फिरोजपुर, जि. मेवात यांचेसह ए.टि.एम. फोडन्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितल्याने मो. आमीर उर्फ अरमान मलीक रा. हैद्राबाद याचा हैद्राबाद येथे शोध घेतला असता मिळून आला नाही. उर्वरीत आरोपीतांचा शोध घेणे कामी दिल्ली व हरीयाणा राज्यात गुरुग्राम, मेवात, फिरोजपुर येथे जावुन आरोपी राशीद खान, आरोपी सल्ली उर्फ सलमान आरोपीतांचा शोध घेतला असता, नमुद आरोपी मिळुन आले नाही. गुन्हयातील आरोपी नामे तस्सी उर्फ तस्लीम उदय खान, वय-२६ वर्ष, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात याचा शोध घेत असतांना गुरुग्राम येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.

नमुद गुन्हयातील आरोपीतांचा पोलीस कस्टडी रिमांड घेवुन गुन्हयात वापरलेली काळया रंगाची थार गाडी हैद्राबाद येथुन किरायाने घेवुन वेगवेगळया नंबर प्लेटचा वापर करून ए.टि.एम. मशिन तोडुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केले असे सांगितले त्यावरून नमुद वाहन आरोपीकडुन एक काळया रंगाची थार गाडी क्रमांक टि.एस. ३१ जे. २२९९ जप्त केली तसेच अधिक विचारपुस केले असता, त्यांनी यापुर्वी जिल्हा- चंद्रपुर येथील पोलीस स्टेशन वरोरा तसेच नागपुर जिल्हयातील विविध ठिकाणी ४ ए.टि.एम. मशिन तोडुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न तसेच एका ठिकाणातील मोबाईल शॉपी फोडल्याचे सांगत असुन अधिक तपास सुरू आहे.

पोस्टे रामनगर अप.क्र. ३६४/२०२३ कलम ३७९, ५११, ३४ भादंवि बंगाली कॅम्प चौक, बैंक ऑफ इंडिया ए. टि. एम. चंद्रपुर फोडण्याचा प्रयत्न करणारे आरोपी १) हुसेन अली वय-२१ वर्ष, रा. पटेल वाडा, आमीरपेठ, हैद्राबाद२) तस्सी उर्फ तस्लीम उदय खान, वय-२६ वर्ष, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात, हरियाणा अटक करून त्याच्या कडून
१) एक काळया रंगाची थार गाडी क्रमांक टि.एस. ३१ जे. २२९९ किमंत १४,०००००/- रु) एक काळया रंगाची स्प्रे बॉटल किमंत २००/- रू.मुद्देमाल जप्त केला
गुन्हे शोध पथक येथिल अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा व गुन्हयात वापरलेल्या काळया रंगाच्या थार गाडीचा शोध घेणे कामी अतिशय परिश्रम घेवुन तांत्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून आरोपीतांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आले.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गाडे, पो. नि. यशवंत कमद तसेच गुन्हे शोध पथक, रामनगर सपोनि देविदास नरोटे, पोउपनि, मधुकर सामलवार, पोउपनि दिपेश ठाकरे, पोहवा सिडाम, पोहवा रजनिकांत, पोहवा ११७६ किशोर, पोहवा २२७३ शरद, पोहवा५३२ सतिश, पोहवा आनंद, पोहवा प्रशांत, नापोशि लालु, पोशि हिरालाल, पोशि रविकुमार, पोशि प्रफुल, पोशि संदिप, पोशि, विकास, पोशि विकास जाधव, पोशि.पंकज, मपोहवा. मोरे पोलीस स्टेशन, रामनगर तसेच सायबर पोस्टे, चंद्रपुर येथील नापोशि.छगन, पोशि.वैभव, पोशि.भारकर, पोशि.राहुल, पोशि.उमेश सहकार्याने कार्यवाही केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment