Ads

वर बैलाच्या चारा, खाली रेती; अवैध रेती वाहतुकीचा नवा फंडा Ox fodder above, sand below; New Style for illegal sand transport

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- रेती तस्करांनी रेतीच्या अवैध वाहतुकीसाठी नवीन फंडा अमलात आणले आहे. गोपनीय माहिती आधारे सिंदेवाही तहसीलदार यांनी आज सोमवार (दि. १ एप्रिल ला) दुपारच्या सुमारास मुरमाडी रेती घाट मार्गावर (ता. सिंदेवाही) शिवारात केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले.
Ox fodder above, sand below;  New Style for illegal sand transport
विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर मध्ये खाली रेती आणि वर बैलाचा चारा भरून नेत असल्याचे आढळून आले असता.तहसीलदार संदीप पानमंद यांना ट्रॅक्टर मुरमाडी रेती घाट मार्गावरून निघाल्याने संशयस्पद वाटल्यामुळे सदर रेतीच्या ट्रॅक्टर ,अडवून पहाणी केली असता ट्रॉलीमध्ये वर बैलाच्या चारा (तनीस), खाली रेती आढळून आली ट्रॅक्टर ट्रॉली पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयात 1ब्रास रेतीसह जप्त करण्यात आली आहे. विना क्रमांक असलेल्या या सदर ट्रॅक्टर ट्रॉलीवर दंडात्मक कारवाई साठी चिमूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे असे सिंदेवाही तहसीलदार संदीप पानंमद यांनी सांगितले आहे. सदर ट्रॅक्टर हा मुरमाडी येथील एका लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकाचा आहे अशी सिंदेवाही तालुक्यातील नागरिकांमध्ये चर्चा केल्या जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment