राजुरा :-सास्ती टाऊनशीप येथील भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या क्षेत्रीय कार्यालय विश्वकर्मा भवन येथे नुकतीच पोवनी २ च्या हर्षा कंपनी (एच.ओ.ई.) व धोपटाळा च्या सीएमपीएल कंपनीच्या कंत्राटी कामगारांची नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी मोठ्यासंख्येने कंत्राटी कामगारांची उपस्थिती होती.
Meeting of contract workers of Ballarpur area concluded.
यावेळी कंत्राटी कामगार प्रभारी जोगेंद्र यादव, महामंत्री अनिल निब्रड, मंत्री श्रीनिवास कोपुला, सह कार्यालय मंत्री प्रवीण रोगे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर सविस्तरपणे चर्चा झाली. त्यांच्या समस्या सोडविण्याकरिता भारतीय कोयला खदान मजदूर संघ कटिबद्ध असून कंत्राटी कामगारांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे उपस्थित पदाधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आले. कामगारांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या न्यायिक मागण्यांसाठी भारतीय कोयला खदान मजदूर संघ नेहमी प्रयत्नशील असणार असे मत पदाधिकारी यांनी व्यक्त केले.
0 comments:
Post a Comment