भद्रावती जावेद शेख : भद्रावती तालुक्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत डॉली पेट्रोल पंप परिसरात तसेच गुलमोहर पार्क, चिचोर्डी येथे दोन मोठी वाहने रंगेहात पकडली. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Major Crackdown on Illegal Sand in Bhadravati! Hyva Truck Carrying 8 Brass of Sand and Truck Carrying 10 Brass Seized!
महसूल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे तहसील मंडळ अधिकारी समीर वाटेकर यांनी आपल्या पथकासह सापळा रचला. चंद्रपूर वरून अवैद्य रेती घेऊन येत असलेल्या संशयित हायवा व ट्रक माहितीनुसार दिलेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे ५ वाजता MH-34 CQ 6099 क्रमांकाचा हायवा ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली असता त्यात अवैध रेती खाली करत असतानाआढळून आली.
दरम्यान, गुलमोहर पार्क, चिचोर्डी येथे हायवामधील सुमारे ८ ब्रास रेती खाली करण्यात येत असतानाच महसूल व गौण खनिज पथक अचानक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने संबंधितांकडे रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता तो उपलब्ध नसल्याचे आढळून आले. हायवा मालकाचे नाव मीतीलेश चन्ने राहणार चंद्रपूर असल्याचे सांगितले जाते संबंधित वाहन व व्यक्तींना ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
याच दिवशी डॉली पेट्रोल पंपाजवळ आणखी एक भला मोठा ट्रक रेतीने भरलेला सापळा रचून जप्त करण्यात आला. संबंधित ट्रक नागपूर (उमरेड )येथील मालक वहील शेख, यांचे मालकीचेअसल्याची माहिती पुढे आली आहे.
सदर कारवाई R.I. समीर वाटेकर ग्रामसुल अधिकारी तलहार , ग्राम महसूलाधिकारी तळवेकर,व त्यांच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या पार पाडली.
८ ब्रास रेती थेट खाली करताना पकड, मोठ्या रॅकेटची शक्यता
,परवाना नसताना खुलेआम रेती उतरणे सुरू, महसूल विभागाची कारवाई ...!
भद्रावतीत अवैध रेती वाहतूक थांबणार का? की माफियांचे जाळे अजून खोलवर आहे? प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 comments:
Post a Comment