पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर च्या वतीने जिल्हास्तरीय कृषी पशुपक्षी मिनी सरस हिराई महोत्सव संपन्न
जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
पशु-पक्षी प्रदर्शनात 23 विविध गटात 97 पशुंचा सहभाग, खिल्लार जातींचा सोन्या बैल व तीन फुटाची पंगनुर गाय ठरली पशु-पक्षी महोत्सवाचे विशेष आकर्षण
पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद चंद्रपूर च्या वतीने 20 मार्चपासून जिल्हास्तरीय कृषी, पशु-पक्षी प्रदर्शनी व मिनी सरस हिराई महोत्सव 2026 चांदा क्लब ग्राउंडच्या पटांगणावर आयोजित करण्यात आली.The District-level Agriculture, Livestock, and Poultry 'Mini Saras Hirai Festival' was successfully concluded on behalf of the Animal Husbandry Department, Zilla Parishad, Chandrapur.
या तीन दिवसीय पशु-पक्षी प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग होते. प्रमुख अतिथी प्रकल्प संचालक मंजिरी टकले, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपआयुक्त डॉ.सुरेश कुंभरे,प्रकल्प संचालक आत्मा अरुण कुसळकर,सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडु आकनुरवार,सहा.आयुक्त सुचिता धांडे,डाॅकांबळे,डाॅ.निखाते,डाॅ.
ओव्हाड,डाॅ.बडोले,डाॅ. रामटेके,डाॅ.प्रमोद जल्लेवार होते. या तीन दिवसीय प्रदर्शनीमध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी व पशुसंवर्धन विषयक मार्गदर्शनात विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प माहीती,वैरण विकास अंतर्गत चारा व्यवस्थापन वैरणीचे विविध प्रकार,स्वच्छ दुग्ध उत्पादन व दुग्ध व्यवस्थापन,परसातील कुक्कुट पालनाचे आधुनिक तंत्रज्ञान, स्वयंरोजगारासाठी शास्त्रोक्त शेळीपालन व पशुसंवर्धन विभागाच्या विविध शासकीय योजनाविषयी अनुक्रमे मार्गदर्शन करण्यात आले. राज्यातून,आंध्रप्रदेश व पंजाब प्रांतातुन सहभागी झालेल्या जातिवंत गाय वर्गात लाल कंधारी, खिल्लार, डांगी ,देवणी, गौळाऊ ,थारपारकर ,काँक्रेज या जातीच्या गायी व वळू विदेशी संकरित एच एफ व जर्सी गाय वळू म्हैस वर्गात मुर्रा, पंढरपुरी ,नागपुरी म्हैस, शेळी गटात तोतापरी बिटल , जमनापारी ,उस्मानाबादी बेरारी जातीच्या शेळ्या व बोकड मेंढी गटात दखनी मेंढी व मेंढा, कुक्कुट गटात कडकनाथ कावेरी सातपुडा असिल जातीच्या कुकुटपक्षीसह पशुसहभागी झाले होते याप्रदर्शनीमध्ये 10 वेळा चॅम्पियनशिप ठरलेला सर्वात उंच,देखना खिल्लार जातीचा आठ फूट लांब व सव्वा टन वजनाचा 15 लाखाचा बैल व आंध्रप्रदेशातील अडीच ते तीन फूट उंचीची 240 दिवस दुध देणारी पंगनुर गाय या महोत्सवात विशेष आकर्षण ठरली.या प्रदर्शनात उत्कृष्ट पशुच्या मालकांचासन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ व रक्कम देऊन गौरविण्यात आले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग व प्रमुख अतिथीनी पशु व स्टालला भेटी देऊन पाहणी करून उपस्थित पशुपालकांशी संवाद साधून शेतकऱ्यांनी शेतीसोबत पशुपालन करून आर्थिक उन्नती करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक जिल्ह्य उपआयुक्त डॉ. सुरेश कुंभरे,संचालन पशुधन विकास अधिकारी डॉ. सतीश अगडते आभार डाॅ.रोहीणी सोमकुवर यांनी केले.यशस्वीतेसाठी पविअ डॉ विकास ताजणे,डाॅ.उईके,डॉ.कलाम, डाॅ.चोपडे,सहा.पविअ/पशुधन पर्यवेक्षक डॉ सोनाली मेश्राम,खाणेकर,आलाम, पिदुरकर, लाडे,दाबेराव,बोडे,आकोलखेडकर सह जिल्ह्यतील अधिकारी,कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.जिल्ह्यातील हजारो पशुपालकांनी प्रदर्शनीला भेट देऊन विविध पशुसंवर्धन योजनाची माहिती देवून माहितीपत्रके वाटप करण्यात आले.
0 comments:
Post a Comment