Ads

लक्कडकोट आरटीओ चेकपोस्टवर लाचखोरीचा भंडाफोड; ACB चा सापळा, दोन आरोपी फरार

राजुरा/नागपूर, दि. 23 मार्च :
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लक्कडकोट येथील आरटीओ चेकपोस्टवर धडक कारवाई करत लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणला.
Bribery Racket Busted at Lakkadkot RTO Checkpost; ACB Lays Trap, Two Accused Absconding
 ‘एंट्री’च्या नावाखाली ट्रकचालकांकडून पैसे उकळले जात असल्याची तक्रार मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला.
तक्रारदार हा मालवाहू ट्रकचालक असून, त्याच्याकडून यापूर्वीही कागदपत्र तपासणीच्या नावाखाली पैशांची मागणी करण्यात आली होती. याबाबत त्याने ACB नागपूर येथे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार 23 मार्च रोजी पडताळणी करण्यात आली असता, खाजगी एजंट विलास देशमुख याने ₹500 लाच मागून स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
ACB पथकाने सापळा रचून आज कारवाई केली असता, एजंट विलास देशमुख याने पंचांसमक्ष ₹500 ची लाच स्वीकारली. ही रक्कम मोटार वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांच्या सांगण्यावरून घेतल्याचा आरोप आहे. मात्र, कारवाईची चाहूल लागताच दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
कारवाईदरम्यान चेकपोस्ट कार्यालयातून ‘एंट्री’च्या नावाखाली जमा करण्यात आलेली ₹7,120 रोख रक्कम, सापळा रक्कम ₹500 आणि आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 7(अ) व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्या नेतृत्वाखाली ACB नागपूर पथकाने केली.
📢 नागरिकांना आवाहन :
शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ अँटी करप्शन ब्युरो, नागपूर येथे संपर्क साधावा.
📞 टोल फ्री : 1064
📱 मोबाईल : 9021452760 / 9067671064
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment