चंद्रपूर | विशेष प्रतिनिधी:-
जगभरात वाढत्या तणाव, युद्धजन्य परिस्थिती आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातून शांततेचा प्रभावी संदेश देण्याचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. Somayya Group of Institutions या संस्थेच्या पुढाकारातून येत्या २८ मार्च २०२६ रोजी वडगाव येथील कॅम्पसमध्ये हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सहभागातून जगातील सर्वात मोठे ‘जागतिक शांतता चिन्ह’ (International Peace Symbol) साकारले जाणार आहे.
यापूर्वी केवळ एका महिन्यापूर्वी, १ मार्च २०२६ रोजी याच संस्थेने २७ महिला व विद्यार्थिनींच्या सहभागातून अवघ्या ७ मिनिटांत २० लावण्यांचे सादरीकरण करून एक विक्रम प्रस्थापित केला होता. आता त्याच जोशात आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्याची तयारी सुरू आहे.A Message of Peace to the World from Chandrapur: Preparations Underway to Set a World Record for the ‘Peace Symbol’ with the Participation of Thousands!
संस्थेचे चेअरमन P. S. Ambatkar यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “युद्ध नव्हे, तर शांती हवी” हा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाची नोंद Guinness World Records मध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, हा उपक्रम तब्बल १८० देशांमध्ये प्रसारित होणार आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तृतीय महायुद्धाची शक्यता वर्तवली जात असताना, चंद्रपूरमधील विद्यार्थी शांततेचा संदेश देण्यासाठी एकत्र येत आहेत. हजारोंच्या सहभागातून साकार होणारे हे ‘पीस सिंबॉल’ केवळ एक आकृती नसून मानवतेची एकता, सहअस्तित्व आणि जागतिक बंधुत्वाचे प्रतीक ठरणार आहे.
हा उपक्रम केवळ विक्रमापुरता मर्यादित नसून, चंद्रपूरचे नाव जागतिक स्तरावर ठळकपणे अधोरेखित करणारा आणि संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी संदेश देणारा ठरणार आहे.
0 comments:
Post a Comment