Ads

गडचिरोली जिल्हयामध्ये अवैधरित्या वाहतुक होणारी लाखोची देशी दारू जप्त

चंद्रपुर :-पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले त्याअनुषगाने पो. नि. महेश कोंडावार, स्थागुशा, चंद्रपुर यांनी पथके नेमुण त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
Illegally transported country liquor worth lakhs confiscated in Gadchiroli district
त्यावरून दिनांक १७/०५/२०२४ रोजी सपोनि गदादे, पोउपनि भुरले व पोलीस स्टॉफ असे पोलीस स्टेशन, मुल परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमिदाराकडुन माहिती मिळाली की, एक महिद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३३ टि. २०१४ मध्ये अवैधरित्या देशी दारूची पोस्टे मुल परिसरातील चिरोली ते सुशी मार्गाने गडचिरोली जिल्हयात वाहतुक करीत आहे अशा खबरे वरून नाकाबंदी करून वाहनास ताब्यात घेवुन नमुद वाहनाची पंचा समक्ष झडती घेतली असता, वाहनामध्ये २५० नग खर्डाचे खोक्यात प्रत्येक खोक्यात १०० नग प्रमाणे एकुण २५,००० नग देशी दारू राकेश संत्रा कंपनीच्या प्रत्येकी ९० एम.एल. ने सिलबंद भरलेल्या प्रत्येकी ३५/- रू. प्रमाणे एकुण किमंत ८,७५,०००/- रूपयाचा माल तसेच गुन्हयात वापरलेली महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३३ टि. २०१४ किमंत ७,००,०००/- रूपये असा एकुण १५,७५,०००/- रूपयाचा माल जप्त केला. आरोपी नामे करणसिंग ओमकारसिंग पटवा, वय-२९ वर्ष, रा. गुरुव्दार जवळ, मुल, चंद्रपुर २) मनोजकुमार जगदीश मुजुमदार, वय ३९ वर्ष, रा. बंगाली कॅम्प, एटापल्ली, जि. गडचिरोली यांना वाहतुक करीत असतांना मिळालेल्या देशी दारू बाबत विचारणा केली असता, त्यांनी सदर देशी दारूचा माल हा नामे अमोल रामदास ढोरे, रा. मुल, चंद्रपुर याचे मालकीचा मौजा चिरोली ता. मुल, जि. चंद्रपुर येथील देशी भट्टी मधुन चार चाकी वाहनामध्ये भरून दिल्याचे सांगितले आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल ओकरे, सपोनि पंकज बोनसे, सपोनि मनोज गदादे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा / ८९८ जयंता चुनारकर, पोहवा /११७६ किशारे वैरागडे, पोहवा/२२९६ रजनिकांत पुठ्‌ठावार, पोहवा/५३२ सतिश अवथरे, नापोशि/१२२७ चेतन गज्जलवार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment