चंद्रपूर :-नवीन बिअर शॉपीला परवाना देण्याच्या कामासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी फरार आरोपी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील याला अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी, १४ मे रोजी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवसांचा पीसीआर दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घुग्घुस येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी यांना बीअर शॉपीचा परवाना हवा होता. 7 मे रोजी दुय्यम निरीक्षक खारोडे यांनी परवाना देण्याच्या कामासाठी एक लाखाची लाच मागितली होती. व कार्यालयीन अधीक्षक अभय खतड यांच्यामार्फत स्वीकारण्यात आले. एसीबीच्या तपासानंतर अधीक्षक पाटील यांनी लाच घेण्याचे मान्य केले होते. या प्रकरणी एसीबीने खारोडे आणि खटाड यांना यापूर्वीच अटक केली होती. तर अधीक्षक पाटील फरार झाले होते. एसीबीच्या पथकाने अधिकाऱ्यांच्या घरातून लाखो रुपयांचा माल जप्त केला होता. दरम्यान, फरार अधीक्षक संजय पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. आता हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती वकिलांच्या माध्यमातून मिळाली आहे. दरम्यान, मंगळवारी 14 मे रोजी फरार आरोपी संजय पाटील याला एसीबीने अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांचा पीसीआर दिला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जिल्ह्यात कुठेही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांचे माध्यम लाचेची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment