चंद्रपूर:-चंद्रपूर शहरातील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी 2017 मध्ये केंद्र, राज्य व महानगर पालिका चंद्रपूर द्वारा शुरू केल्या गेलेल्या अमृत जल योजनेचे काम आजतागायत रखडले असून यामध्ये कोट्यवधी रुपयांचा मोठा घोटाळा झाला आहे. त्यामुळे या योजनेची ईडी विभाग मार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदना द्वारे केली आहे.
पहिली अमृत जल योजना 2017 मध्ये लागू करण्यात आली. त्याची एकूण रक्कम 234 कोटी रुपये होती आणि या योजनेचे काम 2019 मध्ये पूर्ण होणार होते. मात्र ते काम पूर्ण झाले नाही. त्यासाठी महापालिकेने संबंधित ठेकेदाराला एक वर्षाची मुदत वाढवून दिली. मात्र आता सात वर्षे होऊनही ही योजना लागू झालेली नाही. काम अपूर्ण असतानाही महापालिकेने 200 कोटी रुपये संबंधित ठेकेदाराला दिले. या अपूर्ण अमृत जल योजनेसाठी पुन्हा 250 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र शहरात अमृत जल योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या योजनेची ईडी विभागा मार्फत गंभीर चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सोबत याची प्रतिलिपी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व ई.डी. कार्यालय नागपुर ला पाठविणयात आली। निवेदन देतांना शिल्पा कांबळे, विनोद लबणे, परब गिरडकर, विकी दळणे, वसंत पवार अन्य उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment