घाटंजी (तालुका प्रतिनिधी):-राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ विभागाच्या यवतमाळ ते अदिलाबाद जाणार्या फेर्या गर्दीच्या हंगामात ऐन लग्नसराईत राज्य परिवहन महामंडळाला उत्पन्न देणाऱ्या व फायद्याच्या फे-या बंद केल्यामुळे अदिलाबाद जाणार्या व येणार्या प्रवाशांची गैरसोय होत आहेत.
कारण घांटजी,पारवा,अर्ली, सावरगांव, तसेच सीमावर्ती भागातील प्रवाशी,शेतकरी,
शेतमजूर,आदिलाबाद येथे बि-बियाणे आणण्या करिता व बिमार,प्रवासी बांधव यवतमाळ येथे दवाखान्यात विलाज करण्याकरिता येतात.तरी प्रवासी पूर्णपणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी वरच अवलंबुन असतात.तरी दि.१/०५/२०२४ पासून यवतमाळ ते आदिलाबाद व दारव्हा आदिलाबाद हि शेवटची बस असल्याने प्रवासी आपले कामे करून एस.टी बस वर अवलंबून राहतात सदरची फेरी हि फायद्याची असून सुद्धा हेतुपुरस्सर पणे अवैध प्रवासी वाहतूक दारांना मोकळे रान करून त्यांच्या सोबत साटेलोटे करित असल्याचे प्रवाश्यांतून बोलल्या जात आहे.तरी सदर बस फे-या पुर्ववत लवकरात लवकर सुरू करून प्रवाश्यांची गैरसोय दूर करावी अशी प्रवाशांची मागणी आहे.
0 comments:
Post a Comment