Ads

जुनं फर्निचर सिनेमा बघून जेष्ठाच्या डोळ्यात तरडले पाणी

चंद्रपुर :-जेष्ठ नागरिकांच्या समस्यांवर आधारित जुनं फर्निचर या सिनेमाचा शो आमदार किशोर जोरगेवार यांनी वयोवृध्द नागरिकांना दाखविला. यावेळी अम्मा सह सहपरिवार या शो चा आमदार किशोर जोरगेवार यांनी आनंद घेतला. जेष्ठ नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आज आपण 250 जेष्ठ नागरिकांना हा सिनेमा दाखविला असल्याचे ते यावेळी म्हणाले. हा सिनेमा बघून जेष्ठांच्या डोळ्यात पाणी तरडले.
आमदार किशोर जोरगेवार हे नेहमी अभिनव उपक्रम राबवित समाजामध्ये सक्रियरित्या काम करत असतांचे अनेक उदाहरणे आजवर समोर आली आहे. यापूर्वी विविध क्षेत्रात कार्यरत जेष्ठ गुरुंचा त्यांनी सत्कार केला होता. ज्येष्ठ नागरिक संघ सर्व सोयी सुविधायुक्त करण्यासाठी मोठा निधी त्यांच्या वतीने शहरातील 7 ज्येष्ठ नागरिक संघाला उपलब्ध करुन दिला आहे.
दरम्यान त्यांनी मिराज सिनेमागृह येथे जुनं फर्निचर या सिनेमाचा दुपारचा पूर्ण शो शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी बुक केला होता. यावेळी शहरातील रामनगर जेष्ठ नागरिक संघ, चैतन्य जेष्ठ नागरिक संघ, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, विश्रांती ज्येष्ठ नागरिक संघ, विठ्ठल रुखमाई जेष्ठ नागरिक संघ, प्रबुध्द जेष्ठ नागरिक संघ, पसायदान जेष्ठ नागरिक संघ या जेष्ठ नागरिक संघातील जेष्ठांना सदर सिनेमासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते. दुपारी 4 वाजता मिराज सिनेमागृहात सिनेमाला सुरुवात झाली.
जवळपास 250 जेष्ठ नागरिकांनी यावेळी सदर सिनेमाचा लाभ घेतला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार सह सहपरिवार सिनेमाला उपस्थितीत होते. पारिवारीक, सामाजिक जीवन जगत असतांना ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. नकळत अनेक चुका होत असतात. ज्या मुलांना बोट धरुन आपण मोठ करतो तेच शेवटच्या वळणार आई वडिलांना सोडून देतात. त्यानंतर त्यांच्यावर येणारे संकट मोठे असते. आपण आज वयोवृध्द नागरिकांना घेऊन हा सिनेमा पाहिला. वयोवृध्दांना म्हातार वयात सन्मानाने जगता याव ही शिकवण देणारा हा सिनेमा होता. असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. सिनेमा बघून निघाल्यानंतर जेष्ठांच्या भावना त्यांच्या चेह-यावर उमटून दिसत होता.

बॉक्स
वडिल आणि मुलांना एकत्रित सिनेमा पाहण्याची संधी
वस्तुस्थितीवर आधारीत सिनेमा दाखविल्याबदल जेष्ठांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले. सोबतच आमच्या पाल्यांनाही हा सिनेमा आपण दाखवावा अशी आग्रही विनंती केली. त्यानंतर रविवारी पून्हा एकदा सदर सिनेमाचा एक शो आमदार किशोर जोरगेवार यांनी बुक केला असुन सदर शो मध्ये वडिल आणि मुलाला प्रवेश दिल्या जाणार आहे. त्यामुळे वडील आणि मुलाला एकत्रीत हा सिनेमा पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
बॉक्स
95 वर्षीय चंद्रमोर्य राजापूर यांनी घेतला चित्रपटाचा लाभ
आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजित केलेल्या जुना फर्निचर हा सिनेमा बघण्यासाठी 10 किलोमिटरच्या अंतरावरुन 95 वर्षीय चंद्रमोर्य राजापूर हे सिनेमागृहात पोहोचले होते. यावेळी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment