(घाटंजी प्रतिनिधी):-आर्णी तालुक्यात शहर व ग्रामीण भागामध्ये सामाजिक संघटनेच्या वतीने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ नीताताई मडावी (बोरेले) प्रमुख अतिथी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता रजनीकांतजी बोरेले सौ ताराताई नरसेकर श्रीमती,मंगला ताई पिसे, वासुदेव राठोड,दिनेश गाऊत्रे, समन्वयक (महाराष्ट्र माळी मिशन आर्णी विधानसभा) पंकज नरसेकर, सौ किरण देवकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते
आजच्या जीवनात महिलांना होणारा त्रास कौटुंबिक,शैक्षणिक समस्या या शिवाय शासकीय, निमशासकीय कार्यालयात कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आणि अनेक वर्षां पासून विविध प्रकरण नागरिकांचे प्रलंबित आहे. भ्रष्टअधिकारी यांची हेकेखोरी आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष
केळापुर - आर्णी मतदार संघाचा संपूर्ण विकास, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात, अश्या अनेक विषयांवर रजनीकांत डालुरामजी बोरेले, यांनी जोरदार भाषण दिला आहे.
महिलांनी आपली काम कशी करता येईल. यासाठी महिलांचे संघटन महत्त्वाचे आहे सन 2004 पासून घाटंजी तालुक्यामध्ये या संघटनेला सुरुवात झाली बऱ्याच भागामध्ये घरकुल,श्रावण बाळ योजना, निराधार यापासून अनेक लोक वंचित असतात म्हणून आर्णी - पांढरकवडा - घाटंजी या भागामध्ये महिलाचे संघटन उभे करून त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि स्त्रियांचे अधिकाराचे महत्त्व काय सामाजिक कार्य,महिलांचे अधिकार काय ? त्यांनी नेतृत्व कसं केलं पाहिजे याविषयावर सुद्धा विस्ताराने व्हीसल ब्लॉअर रजनीकांत बोरेले यांनी जवळा व आर्णी गावा येथे सहविचार सभा घेऊ त्यांना संबोधित केले
विविध योजनेची माहिती तसेच अनेक कायध्याची माहिती सुद्धा दिली आहे.या शिवाय सद्याचा
राजकीय परिस्थितीवर कडाडुन टीका केली आहे. आपल्याला अनेक लोकांनी आश्वासने दिली परंतु ती कितपत पूर्ण करण्यात आली याविषयी मार्गदर्शन केले
प्रस्ताविक व संचालन सौ तारा नरसेकर यांनी केले आभार सौ मंगला पिसे यांनी मानले
या कार्यक्रमासाठी सौ किरण देवकर,स्वाती मासळकर मालती गावंडे विमल मुजमुले शुभांगी कडूकार उज्वला खंडारे प्रीती सोनटक्के सोनल शेंडे अरुणा पिसे संगीता शेळके ,प्रिया चव्हाण, शिवाजी देवकर,यांनी अथक परिश्रम घेतले आहे
0 comments:
Post a Comment