Ads

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरूध्द धडक कारवाई Local Crime Branch, Chandrapur has taken action against cattle smugglers

चंद्रपुर :-पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचेआदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना दिले. त्या अनुशंगाने पो.नी. महेश कोंडावार स्थागुशा चंद्रपूर यांनी पथक नेमूण त्यांना अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले
Local Crime Branch, Chandrapur has taken action against cattle smugglers
दि. 09/05/2024 चे रात्रौ दरम्यान चंद्रपूर जिल्हा रात्र गस्त पेट्रोलींग करित असता गोपनिय बातमिदारा कडून माहीती मिळाली की मुल मार्गे एक अवैद्य रित्या कतली करिता जनावरे कोंबून भरलेला ट्रक कं. एम.एच. 18 बि.जी. 0754 हा मुल कडून चंद्रपूर कडे येणार आहे अशा खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखा येथिल पंथकाने पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील मौजा लोहारा येथे पंचासह नाकाबंदी करित असता एक ट्रक भरधाव वेगाने मुल कडून येताना दिसल्याने आम्ही सदर वाहनास थांबविण्याचा ईशारा केला असता तो आम्हाला पाहून वाहन न थांबविता पळू लागला व धोकादायक रित्या गाडी चालवून सदर चालकाने मौजा लोहारा ते चंद्रपूर रोडवरील हनुमान मंदिरा जवळ आपले ताब्यातील वाहन सोडून पळून गेला सदर वाहनाची पंचासमक्ष पहाणी केली असता वाहनामध्ये एकुण 37 गोवंशीय जनावरे ज्यामध्ये 03 मृत जनावरे व एक टाटा कंपणीचा 14 चक्का वाहन कं. एम.एच. 18 बि. जी. 0754 चे असा एकूण किमंत 30,50,000/- रू. चा माल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास कामी पोलीस स्टेशन रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले तसेच वाहनामधिल 34 नग गोवंशिय जनावरे यांची देखरेख करणे करिता प्यार फांडेशन दाताळा यांचे ताब्यात देण्यात आले. व 03 मृत गोंवशिय जनावरांचा पंचासमक्ष

पशुवैद्यकीय अधिकारी सा. चंद्रपूर यांचे कडून पोस्टमार्टम करून घेण्याचे सुचनापत्र देण्यात आले. सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन मा. अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे पोहवा दिपक डोंगरे, नितीन साळवे, सुरेंद्र महतो, नापोशि गणेश मोहुर्ले, पोशि गोपीनाथ नरोटे, सतिश बगमारे स्थागुशा चंद्रपूर यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment