Ads

चोरीची रेती वाहतुक करणा-या रेती तस्करांना स्थानिक गुन्हे शाखाने ठोकल्या बेड्याSand smugglers transporting stolen sand were shackled by the local crime branch

चंद्रपुर :-पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रुपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले. त्या अनुषंगाने पो.नि. महेश कोंडावार स्थागुशा, चंद्रपुर यांनी एक पथक नेमुन त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
18,15,000/- seized from three tractors transporting stolen sand
Sand smugglers transporting stolen sand were shackled by the local crime branch
त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे एक पथक पो.स्टे. शेगाव येथे पेट्रोलिंग करीत असता दि. 09.05.2024 गोपनिय बातमीदारा कडुन मिळाली की, काही ईसम ट्रॅक्टरनी अवैधरित्या बोथली नदी घाटातुन ट्रॅक्टरनी अवैधरित्या चोरट्या रेतीची वाहतुक करुन सावरी, गिरोला व आबमक्ता परीसरात करणार आहेत अश्या गुप्त माहिती वरून पहाटे 07.30 वा. दरम्यान सावरी ते गिरोला रोडवर कर्मविर शाळेजवळ सापळा रचुन तिन वेगवेगळ्या ट्रॅक्टर व ट्रॉली त्यांच्या दिशेने येताना दिसले. तेव्हा त्या तिन्ही ट्रॅक्टरला थांबवुन वरील तिन्ही ट्रॅक्टर व ट्रॉलीचा पंचासमक्ष पाहणी केली असता तिन्ही ट्रॅक्टर च्या ट्रॉलीमध्ये अंदाजे तिन ब्रास रेती मिळुन आली. वर नमुद तिन्ही ट्रॅक्टर चे चालकास रेती वाहतुकीचा परवाना (रॉयल्टी) बाबत विचारले असता त्याचे जवळ रेती वाहतुकीचा परवाना नसुन त्याने ती रेती बोथली नदीघाट येथुन चोरुन आणुन मौजा सावरी, गिरोला परीसरात विकण्याकरीता घेवुन जात असल्याचे सांगितले. सदरच्या कारवाईत एकुण 03 ब्रास रेती किं. 15,000/- रु. व 03 ट्रॅक्टर किं. 18,00,000/- असा एकुण 18,15,000/-रु. (अठरा लाख पंधरा हजार रुपये) चा मुद्देमाल जप्त करुन चालक नामे चालक नामे 1) सुनिल शालीक गायकवाड वय 30 वर्षे रा. खानगाव ता.चिमुर जि. चंद्रपुर 2) रविंद्र अंबादास काळसर्पे वय 35 वर्षे रा. बेंबडा ता. वरोरा 3) नितेश नथ्थुजी झाडे वय 33 वर्षे रा. अमरपुरी ता. चिमुर व मालक नामे 4) प्रविण शंकर मोहारे वय 35 वर्षे रा. गिरोला ता. वरोरा 5) दामोघर ताराचंद शेंडे वय 51 वर्षे रा. गुजगव्हाण ता. चिमुर पाहीजे आरोपी नामे 6) प्रशांत उर्फ माकोडा जनार्धन शामकुळे वय 40 वर्षे रा. खडसंगी ता. चिमुर यांचेविरुध्द पो.स्टे. शेगाव येथे विविध कलमां अंतर्गत गुन्हा नोंद करुन जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील तपासकामी पो.स्टे. शेगाव यांचे ताब्यात देण्यात आले.

उपरोक्त कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा., अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे, चापोहवा दिनेश अराडे स्थागुशा चंद्रपुर यांनी सापळा रचुन यशस्वीरीत्या कारवाई केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment