भद्रावती प्रतिनिधी (जावेद शेख):-आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करण्यासाठी अधिकृत व नोंदणीकृत असलेल्या टीडीआरएफला ९ मे रोजी १९ वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्य १ ते ९ मे दरम्यान टीडीआरएफ वर्धापनदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
Patient care by TDRF by distributing fruits to Bhadravati Government Hospital
त्या अनुषंगाने ९ मे २०२३ रोजी भद्रावती कंपनीच्या जवानांकडून कडून मा. टीडीआरएफ संचालक हरिश्चंद्र ब.राठोड व मा. TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुस्कान ज.सैय्यद यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथील रुग्णांना फळे, बिस्कीट व छाच चे वाटप करण्यात आले.वर्धापन दिन महोत्सवांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालय भद्रावती चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल गुरनुले उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी टीडीआरएफ चे साहिल लोखंडे, संजना देवगडे, मनीष राजभर,खुशी गोटेकर,खुशी सिडाम,वैष्णवी नागपुरे,यशस्वी कावरे,राजलक्ष्मी सिंग,पौर्णिमा नागोसे,रितू येवले,तनिषा शाहारे,वनश्री मानकर,आचल बुरटकर,आकाशी दडमल,स्नेहा नागपुरे,प्रीती ढोके,प्रतिभा बगडे,पूर्वा वांढरे,अक्षरा सोनटक्के,श्वेता खंडाळकर ई. उपस्थित होते
---------------------------------------
0 comments:
Post a Comment