चंद्रपूर:- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील विस्तारित राज्यस्तरीय अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्याला राज्यस्तरीय तीन पुरस्कार मिळाले.
Chandrapur district honored with three state level awards of Maharashtra Annis
महाराष्ट्र अंनिसच्या कार्याचा प्रचार प्रसार व समितीचे वार्षिक कार्यक्रम ई अविरत कार्याची दखल घेऊन हे तीनही पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्याला मिळाले. राज्यस्तरीय लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार जिल्हा कार्याध्यक्ष मा. पी.एम. जाधव यांना मिळाला आहे. जिल्हाध्यक्ष सुर्यकांत खनके यांचे मार्गदर्शनाखाली ऊर्जानगर शाखा व चंद्रपूर शाखा मिळून १०० चे वर अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका मासिकाचे वर्गणीदार केल्याबद्दल सुर्यकांत खनके जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांना राज्यस्तरीय शतकवीर पुरस्कार मिळाला आहे आणि ऊर्जानगर शाखेला राज्यस्तरीय लक्षवेधी शाखा पुरस्कार मिळाला आहे. हे तीनही पुरस्कार महाराष्ट्र अंनिसच्या विस्तारित राज्यस्तरीय अधिवेशनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ विचारवंत श्रमिक मुक्ती दलाचे नेते कॉम्रेड डॉ.भारत पाटणकर यांचे हस्ते महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, अंनिप मासिकाचे संपादक डॉ.नितीन शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कार मा.पी.एम.जाधव यांनी स्विकारले.यातील चंद्रपूर जिल्ह्याच्या ऊर्जानगर शाखेला राज्यस्तरीय लक्षवेधी शाखा पुरस्कार हा नुकतीच झालेली ऊर्जानगरची मासिक बैठकीत चंद्रपूर विज केंद्राचे अधीक्षक अभियंता मा.दिनेश चौधरी व जिल्हा कार्याध्यक्ष मा.पी.एम.जाधव,जिल्हा प्रधान सचिव नारायण चव्हाण यांच्या हस्ते शाखेचे अध्यक्ष मुर्लीधर राठोड ,कार्याध्यक्ष देवराव कोंडेकर,सचिव बालकृष्ण सोमलकर,संजय जुनारे,अशोक खाडे, जयदीप राठोड,वंश निकोसे यांनी पुरस्कार स्वीकारला.
0 comments:
Post a Comment