Ads

अमृत जल योजनेचे कनेक्शन लवकरात लवकर सुरू करा : बसपा चे जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार यांची मागणी

चंद्रपुर:- कोट्यवधी रुपये खर्च करून महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपूर शहरात अमृत जल योजना सुरू केली. योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात पाण्याची पाईप लाईन टाकण्याची व्यवस्था करण्यात आली ..तरीसुद्धा शहराच्या अनेक भागात अमृत जल योजनेची पाईप लाईन पोहोचलीच नाही.. आणि ज्या भागात पाईप लाईन पोहोचली त्या भागात कनेक्शन सुरू करण्यात आले नाही.
Start connection of Amrit Jal Yojana as soon as possible: Demand of BSP district president Shirij Kumar Gogulwar
विशेषता: चंद्रपूर शहराच्या महाकाली कॉलरी ,बाबुपेठ , व पठाणपूरा या प्रभागात अजूनही अमृत जल योजनेचे कनेक्शन् सुरू केले नाही.. या प्रभागातील लोकांना पाण्यासाठी दर दर भटकावं लागत आहे.. इतर कोणतेही पर्याय पाण्यासाठी या प्रभागात उपलब्ध नसल्यामुळे , आज बहुजन समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार यांच्या नेतृत्वात तिन्ही प्रभागाच्या महिला मोठया संख्येने चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त आद.विपीन पालीवाल साहेब यांना अमृतजल योजनेचे कनेक्शन महाकाली कॉलरी, बाबुपेठ व पाठानपुरा या भागात लवकरात लवकर सुरू करण्याबबत चर्चा करण्यात आली , सकारात्मक चर्चे नंतर या समस्येसंबंधीचे निवेदन आद. आयुक्त साहेब यांना देण्यात आले..या निवेदन ला येणारे सात दिवसात दकल नाही गेतलास बासापा मोठा आंदोलन करणार याला जवाबदार मनपा राहणार
या वेळी बहुजन समाज पक्षाचे चंद्रपूर शहराचे अध्यक्ष अमोल राहुलगडे, घुगुस शहराचे अध्यक्ष सिद्धांत कोंडागुर्ला, प्रशांत रामटेके, अखिल निमगडे इतर बसपा कार्यकर्ता व महाकाली कॉलरी, पाठानपूरा व बाबुपेठ परिसरातील महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती...
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment