भद्रावती जावेद शेख :-भद्रावती येथील फेरीलैंड शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योगसाधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
International Yoga Day celebrated with enthusiasm at Ferryland School.
सदर कार्यक्रमाला शाळेचे संचालक तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक अड. युवराज धानोरकर, मुख्याध्यापिका वर्षा धानोरकर, विजया देरकर, सुनिता वैद्य, माधुरी येरणे, कल्पना मत्ते, शीला गिरटकर, सुनील वैद्य, विजय डंबारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अड. युवराज धानोरकर यांनी निरामय जीवनासाठी योगाचे असलेले महत्त्व विषद केले.यावेळी योगा प्रशिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना योग साधनेचे धडे दिले. सदर कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment