घुग्घुस:- शहरात अवैध रेती तस्करीला मोठे उधान आले असून आता चिंचोली घाट घुग्घुस येथील वर्धा नदी रेती घाटावरून सुद्धा रात्रीच्या वेळेस ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेतीची मोठी तस्करी होत होती.
आज दि. ०२/०६/२०२४ रोजी पहाटे चिंचोली घाट घुग्घुस येथील वर्धा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून अचानक धाड टाकली असता अवैध रेती उत्खनन करताना आढळल्यामुळे चार ट्रॅक्टर जप्त करून पुढील दंडात्मक कारवाई साठी नायब तहसीलदारकार्यालय घुग्घुस येथे लावण्यात आले.
सदर कारवाई नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार व तलाठी संदेश सरपे यांनी केली.
0 comments:
Post a Comment