Ads

निसर्गाला जपणारा असाही एक वृक्षप्रेमी राहुल जिवणे... Rahul Jiwane, a tree lover who preserves nature...

घाटंजी :- सतत काही ना काही निसर्गासाठी नवचैतन्य संस्था शिरोली, सातत्याने पर्यावरण सरक्षणचे काम करीत असते. यात वृक्ष लागवड, संगोपन, उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करीत असते. लावलेल्या झाडांना जानेवारी ते जून पर्यंत पाण्याची व्यवस्था संस्था करीत असते. या वर्षात लावलेल्या एकूण ३० झाडांना रोज  म्हणजे १५२ दिवस सतत पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. 
Rahul Jiwane, a tree lover who preserves nature...
दररोज १२ लिटर पाणी झाडांना दिल जाते. पाणी देण्याची पद्धत संस्थेने वेगळी वापरली आहे. उन्हाळ्यात थंड पाणी पिण्या करिता लोक अनेक कंपनीचे पाणी विकत घेऊन पितात आणि तश्याच त्या बाटल्या  टाकून देतात. यामुळे पर्यावरणात प्लास्टिक मध्ये भर पडत असते. यावर उपाय म्हणून संस्थेने या बाटल्या जमा करून त्यावर प्रायोगिक तत्वावर काम करण्याचे ठरवले. त्या नुसार बाटलीच्या तळावरील भागास एक  छिद्र पडून त्यात सुतळी टाकण्यात आली.या सुतळीला आजूबाजूला पडलेल्या खऱ्याच्या पन्नीने त्या सुतळीच्या  मध्यभागी गुंडाळले या मुळे इतरस्थ  बाटलीतील पाणी जाणार नाही. उर्वरित सुतळी हि झाडांच्या  बुडालगत सोडली. यामुळे सर्व पाणी हे झाडाच्या बुडाजवळ मुरेल. झाडाच्या बुडालगत असलेले पाणी बाष्पीभवन होऊ नये म्हणून झाडाच्या बुडाला खालच्या भागाला रान गवऱ्या त्यानंतर रान गवात झाकण्यात आले. यामुळे उन्हामुळे जमिनीवर असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही. सोबतच झाडाच्या बुडाला असलेल्या रान गावाऱ्यांना खाण्या करिता वेगवेगळे जीव या ठिकाणी पाहायला मिळाले. हे जीव जमिनीतून खालवर होत असल्याने झाडाच्या बुडालगतची जमीन हि भुसभुशीत झालेली पाहायला मिळाली. झाडाच्या मुळालगत हे पाणी थेंब थेंब जात असल्याने व जमीन भुसभुशीत असल्याने झाडाच्या मुळा पर्यंत ऑक्सिजन जाते व मुळे  वाढण्यास मोठी मदत होतांना पाहायला मिळाली. एकूणच त्या झाडाच्या बुडाला एक परिसंस्था निर्माण झालेली पाहायला मिळाली. या आच्छदान मुळे जे मुळा लागत थंडावा निर्माण होते त्या थंडाव्याने मुंग्या, सापसुई, सरड्याचे पिलं, विविध प्रकाचे जीव आश्रय घेताना पाहायला मिळाले. एक लिटर बाटलीतील पाणी १२ ते १५ तास पुरते. सोबतच झाडाच्या बुडालगत असलेला ओलावा आचछादना मुले १२ तास राहतो यामुळे झाडाला ४८ तासांनी  पाणी दिल तरी चालते. 
या प्रायोगिक तत्वावर काम करण्या करिता अमोल नीलकंठ गायकवाड यांनी बाटल्याचे संकलन करण्यास मदत केली तर सुतळी करीता वैभव सुभाष सोनटक्के या दोन तरुणाने मदत केली. या कामा करिता  राहुल जीवने यांनी तांत्रिक परिश्रम घेतले व  मुख्य मार्गदर्शक सुभाष मानकर याचे मिळाले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment