(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्र बफरझोन मधील आज दिनांक 19/07/2024 शुक्रवार ला सकाळी अंदाजे 7.30 वाजता उपवन परिक्षेत्र नलेश्वर मोहाळी गावातील घरात घुसून बिबट्याने सकाळी त्या गावातील घरातील सहा इसमावर हल्ला करून जखमी केले .
Six people were injured after 3 leopards entered a house in Mohadi village
मोहाळी येथिल जख्मी मध्ये एकुण 6 व्यक्ती खालील प्रमाणे 1)विजय देवगीरकर वय अंदाजे 35 वर्षे 2) मनोहर दांडेकर वय अंदाजे 50 वर्षे 3) जितेंद्र दांडेकर वय अंदाजे 30 वर्षे 4) सुभाष दांडेकर वय अंदाजे 25 वर्षे 5) ऋतिक वाघमारे वय अंदाजे 18 वर्षे 6) पांडुरंग नन्नावरे वय अंदाजे 32 वर्षेअसून जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र मोहाळी येथे प्राथमिक उपचार करून चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पुढील उपचाराकरता हलवण्यात आले आहे. गावातील नागरिकांनी संबंधित वन विभागाला वेठीस धरून वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याची नागरिकात रोष आहे. घटनास्थळी सध्या चंद्रपूरातून रेस्क्यू टीम गावी पोहचली आहे.
0 comments:
Post a Comment