राजुरा :-श्री शिवाजी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजुरा येथे नुकताच विद्यार्थी संवाद कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वरकड हे उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्ह्णून यशवंत शितोळे ,अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धा परीक्षांमध्ये व उद्योजक निर्मिती यांत करिअर कट्टा कशी महत्वाची भूमिका बजावणार आहे याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शैक्षणिक सत्रातील वर्षभरातील उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व विद्यार्थि मोठ्यासंख्येने उपस्थित झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समन्वयक डॉ. सारीका साबळे यांनी केले. प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय, गडचांदूर येथील प्राध्यापक , विद्यार्थी तसेच ऍड. यादवराव धोटे महाविद्यालय राजुरा, महात्मा गांधी महाविद्यालय, गडचांदूर येथील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. करिअर कट्टा च्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थीना स्पर्धा परीक्षेची तयारी तसेच उद्योग निर्मिती यात मार्गदर्शन दिले जात आहे.
0 comments:
Post a Comment