Ads

ढोरवासा केंद्राची पहिली शिक्षण परिषद संपन्न

भद्रावती तालुका प्रतिनिधी- भद्रावती तालुक्यातील ढोरवासा केंद्राची शिक्षण परिषद डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, मुरसा येथे नुकतीच थाटात पार पडली.
The first education conference of Dhorwasa Center was concluded
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. डॉ. प्रकाशजी महाकाळकर साहेब व संवर्ग विकास अधिकारी मा. आशुतोष सपकाळ साहेब यांच्या प्रेरणेने ढोरवासा केंद्राची पहिली शिक्षण परिषद डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, मुरसा येथे नुकतीच पार पडली. परिषदेला अध्यक्ष म्हणून केंद्राचे केंद्रप्रमुख मा श्री भारतजी गायकवाड सर तर उदघाटक म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांगली चे मुख्याध्यापक श्री संजय माथनकर व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, मुरसा चे मुख्याध्यापक श्री शंकर पुंजेकर सर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरसा चे मुख्याध्यापक श्री दमके सर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरादेवी चे मुख्याध्यापक श्री. वागदरकर सर , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुनाडा च्या मुख्याध्यापिका कु. नाकाडे मॅडम लाभले होते यात तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, मुरसा चे श्री मानकर सर व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांगली चे श्री माथनकर सर उपस्थित होते.
परिषदेच्या पहिल्या सत्रात माता सावित्रीबाई फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विधिवत सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचे शब्दसुमनांनी, सुमनांनी व स्वागतगीतांनी स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेमध्ये श्री पुंजेकर सर यांनी परिषदेची रूपरेषा मांडली व अध्यक्षीय भाषणात श्री गायकवाड सर यांनी मुलांच्या प्रगतीसाठी शिक्षकांना आता परिपूर्ण होण्याची गरज आहे, मुलांच्या पटसंख्येवर आपले भविष्य ठरलेले आहे त्यासाठी गुणवत्ता वाढविण्याची गरज आहे. शासनाचे आलेले परिपत्रक वेळोवेळी तपासून त्याची अंमलबजावनी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले व त्यांनी एक छानसे विज्ञान गीत गाऊन अध्यक्षीय भाषणाची सांगता करण्यात आली.
त्यानंतर परिषदेच्या पहिल्या सत्रात तज्ञ मार्गदर्शक श्री माथनकर सर यांनी बालकांचे मानसशास्त्र यावर छान प्रकाश टाकला आपला डावा आणि उजवा मेंदू यावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून ते कसे काम करतात, उजवा मेंदू कधी सक्रिय काम करतो हे समजावून सांगितले, त्यानंतर आठ बुद्धिमत्ता बद्दल पण छान मार्गदर्शन केले, त्यात शिक्षकांनी मुलांच्या फक्त भाषिक आणि गणितीय बुद्धिमत्तेकडेच लक्ष न देता इतर सहा बुद्धिमत्ता पण महत्वाच्या आहे याचे उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले. अध्यापनात गणितीय साहित्य पेटीचा वापर कसा करावा यावर पण मार्गदर्शन करून सत्राच्या पहिल्या सत्राचा समारोप करण्यात आला, त्यानंतर आयोजित शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांना जेवणाची मेजवानी देण्यात आली.
परिषदेच्या दुसऱ्या सत्रात तज्ञ मार्गदर्शक श्री मानकर सर यांनी भविष्यवेधी शिक्षण आणि शिक्षकांची जबाबदारी यावर प्रकाश टाकताना भविष्यवेधी शिक्षणाचे चार आयाम असे मूल तयार करणे जे भविष्यासाठी तयार असेल, असे मूल तयार करणे ज्याला जागतिक स्वीकार्यता असेल, 100% मुलांच्या 100% क्षमतांचा उपयोग करणे, PISA Ready मुले तयार करणे. यावर प्रकाश टाकून उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. सोबत भविष्यवेधी शिक्षणाच्या सहा पायऱ्या पण समजावून सांगितल्या यात मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, Learning Intervention, जागतिक स्विकार्यता असलेली मुले तयार करणे, मुलांना आव्हान देणे, पाठ्यक्रम 1/3 वेळेत पूर्ण करणे, तंत्रज्ञानाचा वापर करणे, यावर सविस्तर मार्गदर्शन केले व 6cs Critical Thinking, Creative Thinking, Collabration, Communication, Compassion, Confidence सांगितले.
परिषदेच्यामध्यंतरात गटशिक्षणाधिकारीश्री डॉ महाकाळकर साहेब यांनी भ्रमणध्वनी द्वारे शिक्षकांशी संवाद साधून येणाऱ्या काळात शिक्षकांनी परिपूर्ण राहून विद्यार्थी हित जपावे असे सांगून परिषदेला शुभेच्छा दिल्या.
परिषदेचे संचलन कु दिक्षा पचारे हिने केले तर आभार प्रदर्शन श्री धोटे सर यांनी केले शेवटी कार्यक्रमाची वंदे मातरम घेऊन सांगता करण्यात आली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment