वरोरा: शासन निर्देशाप्रमाणे आपल्या संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात 5 जुलै 20 जुलै 2024 या कालावधीत शाळाबाह्य व स्थलांतरित बालके शोध मोहीम अंतर्गत दिनांक 13 जुलै 2024 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री नितीन भाऊ मत्ते व त्यांचे मा.सहकारी यांच्या सहकार्याने व त्यांच्या सन्माननीय सहकाऱ्यांसोबत आनंदवन चौक वरोरा परिसरात सायंकाळी 5 ते 9 सायंकाळी या वेळेत शाळाबाह्य व स्थलांतरित बालके शोध मोहीम राबविण्यात आली.
यात सहा ते चौदा वयोगटातील भटकंती व्यवसाय करणाऱ्या पालकांची मुले शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले.
त्यांच्या पालकांना सदर बालकांना च्या शाळेत दाखल करणे बाबत शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते व मा.त्यांच्या सहकाऱ्यांतर्फे केळी देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
परंतु सदर बालकांचे पालक त्यांच्या पाल्यास नियमित शाळेत दाखल करण्यास उदासीनता दाखवत होते.
बरेच प्रयत्न करून आणि आरटीई कायद्यानुसार पालकांना आपल्या पाल्यास शाळेत दाखल करणे अनिवार्य आहे, या बाबत कल्पना देऊन सुद्धा सदर बालकांचे पालक त्यांच्या पाल्यांना नजीकच्या शाळेत दाखल करण्यास तयार होत नव्हते.
शेवटी न राहवुन पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले. लागलीच लगेचच तेवढ्याच तत्परतेने आणि आत्मीयतेने वरोरा ठाण्याचे ठाणेदार साहेब आपल्या ताफ्यानीशी सदर ठिकाणी हजर झाले.
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते, माननीय ठाणेदार साहेब वरोरा व त्यांचे मा. सहकारी ,मा. गटशिक्षणाधिकारी श्री ज्ञानेश्वर चहारे साहेब साहेब, पं.स.वरोरा ,मा.से.नि. शिविअ श्री नामदेव राऊत साहेब,मा.मु.अ.आश्रम शाळा सुमाठाना,मा.स.शि. श्री अजय मुडपल्लीवार सर,साधनव्यक्ती श्री खुशाल गटसाधन केंद्र वरोरा तसेच वरोरा येथील नागरिक यांच्या उपस्थितीत सदर बालकांच्या पालकांना शाळेत दाखल करणे बाबत व कायद्याने किती बंधनकारक आहे याबाबत आपुलकीने मार्गदर्शन करण्यात आले.
शेवटी सर्वांच्या उपस्थितीत सदर बालकांचे पालक आपल्या पालकांना नजीकच्या दाखल करण्यास तयार झाले.
जवळपास सायंकाळी साडेनऊच्या सुमारास उपरोक्त सर्वांच्या उपस्थितीत सदर बालकांना आश्रम शाळा सुमठाणा येथे दाखल करण्यात आले.
0 comments:
Post a Comment