सादिक थैम वरोरा: आईने हातातील मोबाईल हिसकावून घेतल्याचा राग धरून एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज वरोरा तालुक्यात घडली.
वरोरा तालुक्यातील शेगाव(बू) पोलीस स्टेशन अंतर्गत वायगाव (खु)येथे ही घटना घडली.करिश्मा प्रभाकर मन्ने वय 20 वर्ष ही आज 18 जुलै रोज सोमवारला मोबाईल बघत होती. त्यामुळे तिच्या आईने तिच्या हातून हा मोबाईल हिसकावून घेतला .या गोष्टीचा राग धरून तिने आपल्या राहत्या घरी दुपारी चारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेचा तपास ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांचे मार्गदर्शनास पी एस आय सूरजुसे हे करीत आहेत.
0 comments:
Post a Comment