Ads

कृषी दिन व वसंतराव नाईक जयंती व वन महोत्सवानिमित्त TDRF द्वारा "एक जवान, एक वृक्ष" या उपक्रमाद्वारे तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण On the occasion of Agriculture Day and Vasantrao Naik Jayanti and Forest Mahotsav by TDRF under the initiative "Ek Jawan, Ek Vriksha" tree plantation at various places in the taluka.

जावेद शेख तालुका प्रतिनिधी भद्रावती :-भद्रावती दरवर्षीप्रमाणेदि. १ जुलै रोजी कृषी दिन व हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त TDRF द्वारा "एक जवान,एक वृक्ष" "One Young One, One Tree" हा उपक्रम राबवून विदर्भातील वेगवेगळ्या कंपनीतील (तालुक्यांमधील) सर्व TDRF अधिकारी व जवान यांनी आपल्या घराच्या अंगणात तसेच आजूबाजूच्या परिसरात सोबतच मोकळ्या जागेत व ज्या ठिकाणी झाड नाही अशा विविध उपयोगी वृक्ष लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन त्यांची निगा राखण्याचे संकल्प घेतले. 
On the occasion of Agriculture Day and Vasantrao Naik Jayanti and Forest Mahotsav by TDRF under the initiative "Ek Jawan, Ek Vriksha" tree plantation at various places in the taluka.
TDRF द्वारा वृक्ष लागवडीचा प्रण
TDRF संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात सर्व TDRF अधिकारी आणि जवानांनी १ जुलै २०२४ ते ५ मार्च २०२५ पर्यंत वृक्षरोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा प्रण घेतला आहे. या कालावधीत TDRF द्वारा विविध ठिकाणी झाडे लावण्यात येईल व नागरिकांमध्ये पर्यावरण संबंधित जनजागृती करून  झाडे लावण्यास इच्छुक नागरिकांना झाडांचे वाटप करून त्यांच्या हस्ते झाडे लाऊन त्यांचे संगोपन करण्यात येईल.


या उपक्रमाच्या माध्यमातून भद्रावती तालुक्यातील TDRF जवानांनी TDRF संस्थापक तथा संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात कर्मविर विद्यालय तसेच भद्रावती तहसील च्या वेगवेगळ्या  भागात विविध ठिकाणी नीम पीपल सीताफळ जाम गुलमोहर जामून सिंदूर इ. उपयोगी वृक्षांची लागवड केली. या उपक्रमाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून TDRF जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस व TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद कार्यरत होते. सोबतच भद्रावती मधील खुशी सिडाम, खुशी घोटेकर,आरव प्रसाद, स्नेहा नागपुरे, पौर्णिमा नागोसे, अक्षरा सोनटक्के, तनिषा सहारे, अकशी दडमल, वैष्णवी नागपुरे  .  इ. जवानांनी विशेष कार्य केले. यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल चे शिक्षक उपस्थित होते,
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment