Ads

सास्ती-बल्लारपूर मार्गावरील पुलावरील अपघातात वेकोली कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

राजुरा, (तालुका प्रतिनिधी):- वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी डीप कोळसा खाणीत कामाला असलेल्या सास्ती येथील तरुणांचा सास्ती -बल्लारपूर मार्गवरील वर्धा नदीच्या पुलावर 2 जुलै सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान झालेल्या अपघातात घटनास्थळी दुर्दवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
WCL employees died on the spot in an accident on the bridge on the Sasti-Ballarpur road
मृतक तरुणाचे नाव सचिन अशोकराव पत्तीवर असून तो काही दवसापूर्वीपासून चंद्रपूर येथे राहात होता तिथून ये-जाकरतांना नेहमीप्रमाणे सकाळी ड्युटीला येताना समोर गाडी असल्याचे पाहून पुलावर खड्डा चुकविताना तोल गेल्याने डोक्याला जबर मार बसला अखेर घटनास्थळीच मृत्यू झाला तो आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता त्याचे मागे पत्नी व एक मुलगा आहे
घटनेची बातमी कळताच सास्ती-बल्लारपूर वासियांनी एकच गर्दी केली सचिन हा स्वभावाने अतिशय चांगला होता असल्याने गावात व त्याचे परिवारात दुःखचा डोंगर कोसळला आहे त्याच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या अचानक जाण्याने आप्तेष्ट अत्यंत भावुक झाले होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment