जावेद शेख तालुका प्रतिनिधी भद्रावती :-भद्रावती कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करावी या मागण्यांसोबतच अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी भद्रावती तालुका कोतवाल कर्मचारी संघटनेतर्फे येथील तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
मागण्या त्वरित मान्य न केल्यास कोतवाल संघटनेतर्फे राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे. राज्यातील सर्व कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करावी, तलाठी व लिपिक पदांमध्ये 25% कोटा राखीव ठेवण्यात यावा, सेवानिवृत्त कोतवालांना पेन्शन व अनुकंप लागू करण्यात यावा, कोतवाल पदाचे नाव बदलून त्यांना तलाठी सहाय्यक किंवा महसूल सेवक करावे,कोतवालांमधून शिपाई पदावर देण्यात येणारा 40% कोटा वाढवून तो 80% करावा आदी मागण्या सदर निवेदनातून करण्यात आले आहे. निवेदन सादर करताना कोतवाल संघटनेचे अध्यक्ष बंडू पारखी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment