Ads

वरोरा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांची तडकाफडकी बदली

सादिक थैम :-वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी कोरपनाचे निरीक्षक अजिंक्य तांबडे यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांनी आज 2 जुलै रोज मंगळवारला कार्यभारही सांभाळला आहे.
Hasty transfer of Warora Police Inspector Amol Kachore
वरोरा येथील आनंदवनातील तरुणीच्या खुनाचा आरोपी याने वरोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस कस्टडीमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याने त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यांचा पोलीस कर्मचाऱ्यांवर धाक नसल्याचे व शहर व परिसरात वाढलेली गुन्हेगारी ही त्यांच्या बदलीस कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.अमोल काचोरे यांची नेमणूक जिल्हा पोलीस कंट्रोल रूम मध्ये झाल्याचे वृत्त आहे.
वरोरा पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळलेले अजिंक्य तांबडे यांची पंधरा दिवसांपूर्वीच कोरपनाचे पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.आता त्यांच्यावर वरोरा पोलीस स्टेशनचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
ठाणेदार काचोरे यांचे कर्मचाऱ्यावर वचकच नाही

वरोरा पोलीस स्टेशनच्या पदभार पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी स्वीकारला. तेव्हापासून वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध व्यवसाय, गुन्हेगारी, चोरी, घरफोडी च्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असुन हा आलेख दिवसेंदिवस वाढत असताना दिसून येत आहे. तर वरोरा पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यावर ठाणेदार अमोल काचोरे यांचे वचक नसल्याचे बोलल्या जात आहे.
रविवारी घडलेल्या घटनेतून ठाणेदार काचोरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. स्टेशन डायरीच्या अगदी समोर आरोपीला अटकेत ठेवण्याची रूम आहे. असे असतानाही खुनातील आरोपी समाधान माळी याने कोठडीच्या बाहेर ठेवलेला जुता आतमध्ये ओढला आणि त्याची लेस काढून गळफास घेतला.
सकाळी स्टेशन डायरीवर कर्तव्यावर असलेले कर्मचारी सकाळी कधीच आत मध्ये राहत नाही ते बाहेर बसून असतात. याचाच फायदा घेत आरोपीने गळफास लावला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment