राजुरा 31 ऑगस्ट :-शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर द्वारा आयोजित तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा राजुरा तालुका क्रीडा संकुल येथे पार पडल्या. यात आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा या शाळेतील चौदा वर्ष वयोगटातील मुली अनुष्का वांढरे, दिव्या पिंपळकर, निकिता वानखेडे, प्रांजली उपासे, भावना चोथले, मनस्वी कुळसंगे, मानसी आस्वले, मृणाली किन्नके, लावण्या झाडे, शिफानाज शेख, सानिका येरणे, स्वरा रेगुंठावार,
आदर्श हायस्कुल शाळेतील सतरा वर्ष वयोगटातील मुली अक्षरा शेंडे, अनोखी निकोडे, आकांक्षा कोंडेकर, चैताली वडस्कर, जागृती धंदरे, तन्वी पांडव, नेहा रागीट, मानसी बोबडे, मैथिली रेगुंठावार, शिवानी मसे, समृद्धी येरणे, सुहाना पहानपटे यांची जिल्हा स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेकारिता निवड झाली आहे. मुलींचे हे दोन्ही संघ राजुरा तालुक्याचे चंद्रपूर जिल्ह्यास्तरावर नेतृत्व करणार आहे.
District level selection of fourteen and seventeen year old girls of Adarsh School for school kabaddi games.
यावेळी राजुरा तालुक्यातील क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक शिक्षिका यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
तालुका क्रीडा संयोजक एस. टी. विरुटकर यांनी उपस्थित विध्यार्थीना तालुका स्तरावरील विविध स्पर्धाची माहिती दिली व कबड्डी या खेळाचे नियम अटी सांगितल्या. विजयी संघातील खेडाळू चे आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुलचे मुख्याध्यापक सारिपुत्र जाँभूळकर, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख क्रीडा मार्गदर्शक बादल बेले, रुपेश चिडे, ज्योती कल्लूरवार, रोशनी कांबळे, वैशाली टिपले,जयश्री धोटे, सुनीता कोरडे, अर्चना मारोटकर, रजनी पिदूरकर, प्राजक्ता साळवे, किसन वेडमे, नवनाथ बुटले, मेघा वाढई, आशा बोबडे, प्रशांत रागीट, विकास बावणे, भाग्यश्री क्षीरसागर, अंजली कोंगरे आदींनी अभिनंदन केले. यावेळी बादल बेले यांनी विजयी संघातील प्रत्येक खेडाळू, त्यांचे वर्गशिक्षक यांना भेटवस्तू देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
https://whatsapp.com/channel/0029VafRLPdISTkNMhf1cc3J
0 comments:
Post a Comment