घाटंजी प्रतिनिधि:- भारताच्या सीमेवर संरक्षण करुन सेवानिवृत झालेल्या माजी सैनिकांना शि. प्र .मं. विद्यालय घाटंजी च्या विद्यार्थ्यानी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
By tying rakhi to ex-soldiers. Students of the school celebrated Raksha Bandhan
यावेळी मेजर तुलशिदास आत्राम यांनी भारतीय सेनेत असतांना कारगिल युध्दाच्या प्रसंगाचे वर्णन आपल्या भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक फिरोज पठान होते.स्वातत्र्यांच्या ७५ व्या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून सुरू झालेला माजी सैनीकांकरीता रक्षाबंधन सोहळा याही वर्षी विद्यालयात साजरा करण्यात आला .यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनीनी स्वनिर्मीत राख्या तयार केल्या त्या राख्या माजी सैनिकांनां बांधण्यात आल्या कार्यक्रमाची सुरुवात" ऐ मेरे वतन के लोगो" या देश भक्ति पर गीत गायनाने झाली हे गीत कु मेहरा भोयर, कु क्षितिजा नखाते ,कु अक्षरा उगले, कु श्वेता बाहेकर ,यांनी गायन केले संगीत शिक्षक विनोद ठाकरे , सुजल देवळे यांनी संगीत दिले
यावेळी मंचावर माजी सैनिक नायक उत्तमराव अड्र्सकर, हवालदार मधुकर भगत , पर्यवेक्षक मनोज बुरांडे, जेष्ठ शिक्षक संदीप गोडे होते पर्यवेक्षक मनोज बुरांडे यांनी प्रास्तविक केले, तर संचालन शिक्षक प्रशांत उगले यांनी केले आभार ज्ञानेश्वर मस्के यांनी मानले.
प्रा. कु मंजुषा इंगोले, कु चारुशीला पंधरे, कु स्मिता पड़वे, कु जयमाला जुमनाके , कु प्रफुल्ला गुल्हाने , महेश वाघाड़े, रवी डांगे गजानन उत्तरवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment