Ads

काँग्रेस कामगार संघटनेच्या निवेदनाची दखल, सहाय्यक कामगार यांनी बोलावली बैठक.

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व मृत्यू कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत मिळण्याकरिता छोटूभाई शेख व त्यांचे सहकारी यांचा पुढाकार.
Taking note of the statement of the Congress Workers' Union, a meeting was called by the auxiliary workers.
चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील कामावर मृत्यू झालेल्या बांधकाम कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत मिळण्याकरिता सहाय्यक कामगार आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर निवेदनाची प्रत कामगार मंत्री, पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, विरोधी पक्ष नेते विजय भाऊ वडेट्टीवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर पाठवण्यात आली असून या सर्वांच्या सहकाऱ्यांनी दोन जिल्ह्यातील नोंदणी प्राप्त बांधकाम कामगाराचे कामावर मृत्यू व गंभीर आजारी कामगार व त्याचा वारसांना 5 वर्ष लोटून सुधा आर्थिक मदत मिळालेली नाही असे असे निदर्शनात आले असल्याने मृत्यू पावलेल्या कामगारांच्या वारसाना आर्थिक मदत द्यावी अन्यथा कांग्रेस असंघटित कामगार कर्मचारी विभाग माध्यमातून आंदोलन करण्यात येईल असा इशारा छोटूभाई शेख व त्यांचे सहकारी यांनी दिला होता त्याची दखल घेऊन उद्या दिनांक 22 ऑगस्ट 2024 ला 4 वाजता सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे.

इमारत बांधकाम कामगार
1 आरिफ शेख मृथक वरोरा
2 राजू जोगी
3 अरुण चापले
4 गणपत परचाके
5 सय्यद इशाद अली
6 चेतराम पेंदोर
7 पुनाजी बोधलकर
8 ईश्वर गुरनुले
9 भास्कर बोरकुटे
10 सुनंदा रणदिवे यांच्यासह चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्रकरणं प्रलंबित असून 5 वर्षांपासून त्यांचा वारसानाना मोबदला मिळाला नाही पर्यायाने या कार्यालयात येण्या जाण्याकरिता व कामाच्या माहितीकरिता हजारो रुपये आतापर्यंत खर्च झाले आहे. ज्या यक्तीने पैसे खर्च केले त्याचे काम लवकर होत असून ज्यांनी पैसे दिले नाही त्याचे काम वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवण्यात येत आहे. एकीकडे सरकार
बोगस कामगार नोंदण्या करून
रोजगार दिल्याचे दाखवीत आहे.

दुसरीकडे काम करत असताना मृत्यू झालेल्या अनेक कामगाराच्या वारसनाला पैसे न मिळाल्यामुळे त्यांचा हक्काच्या आर्थिक मदत योजनेपासून वंचित ठेवत आहे . तरी
मृत्यू कामगार आरिफ बसिर शेख वय 27 वर्ष कॉलरी वार्ड , वरोरा मृत्यू दि. 28.3.2019 पाच वर्षापासून वारसान एकटी आई आर्थिक मदतीसाठी भटकत आहे .या प्रकरणासह मागील पाच वर्षांपासून प्रलंबित सर्व प्रकरण पंधरा दिवसांचा आत मार्गी लावून गोर गरीब पीडित मृत्काचा वारसांना आर्थिक मदत देण्यात यावे अन्यता सोळाव्या दिवशी मृत्कायचा नातेवाईकाला घेऊन सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन
करण्यात येईल असा इशारा निवेदन
काँग्रेस असंघटित कामगार कर्मचारी विभागाचे पदाधिकाऱ्यांनी दिला होता

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा नागपूर विभाग प्रभारी शेख जैरुदीन छोटूभाई व त्यांचे सहकारी जिल्हाध्यक्ष प्रफुल जाधव शहराध्यक्ष मनीष बावणे
प्रदेश प्रतिनिधी कमलेश बांबोडे विनोद संकेत महिला जिल्हाध्यक्ष शालिनी भागात सय्यद अलीम भाई जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट सुनिता पाटील मेहबूब भाई प्रवीण शेगावकर प्रगती भोसले महिला जिल्हा उपाध्यक्ष रिजवान रंगरेज यांची उपस्थित होती निवेदन व आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल सहायक कामगार आयुक्त यांनी घेऊन उद्या दिनांक 22 ऑगस्टला चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील
मागील 5 वर्षांपासून प्रलंबित असलेले कामावर मृत्यू झालेल्या बांधकाम कामगाराच्या व गंभीर जखमी कामगारांनीच्या वारसांना आर्थिक शासकीय मदत मिळण्याकरिता उद्या 4 वाजता चंद्रपूर कार्यालय बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व मृत्यू कामगारांच्या वारसांना कागदपत्र घेऊन वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन व विनंती कामगार नेते छोटू भाई यांनी केली आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment