मुल :- मुल तालुक्यातील मौजा चीचाळ ! येथील गुराखी मुनिम रतीराम गोलावार वय (४१) हे काल दिनांक १८/८/२०२४ रोजी सकाळी नेहमीच्या वेळेला बकरी चराईसाठी नेले असता वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक ७५२ या जंगल परिसरात वाघाने हल्ला करुन गुराखी मुनिम रतीराम गोलावार यांना ठार केले.
Cowherd killed in tiger attack
ही घटना सायंकाळी ५-३० च्या दरम्यान घडली असावी असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. या घटनेची माहिती प्राप्त होताच विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, व वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी चीचपल्ली (प्रादेशिक) प्रियंका वेलमे यांना मिळताच त्यांनी दिलेल्या आदेशान्वये क्षेत्र सहाय्यक एम.जे. मस्के व वनरक्षक सुधीर ठाकूर, राकेश गुरनुले, संजीवनी पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झीरे व त्यांची टीम सकाळी ६-०० वाजता यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन शोध घेतला असता सदर इसमाचा मृतदेह सापडला.
घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविल्याचे सांगितले. गुराखी मुनिम गोलावार याला पत्नी दोन लहान मेले असा परिवार असून कमवता व्यक्ती गेल्याने कुटुंब निराधार झाला. पुढील तपास मुल पोलिस व वनविभाग करीत आहे.
0 comments:
Post a Comment