Ads

गोट्याला लागली आग मोठी पशु हानी

वरोरा प्रतिनिधी( सादिक थैम):-
शेकोटी मुळे लागली आग जनार्दन सिताराम शेंडे, यांचे स्वतःच्या गोठ्यातील दावणीला बांधलेल्या चार बैलापैकी पैकी एक बैल जागगे वर मरण पावला, तर एक जखमी असून, तेथील दोन बाजूला सुखरूप आहे, तसेच त्याच गोठ्यात शेती उपयोगी अवजार, आणि जनावरचे संपूर्ण वैरण जडले असून अंदाजे 1,50,000 रुपयाचे नुस्कान झाले.
A fire broke out in Cattleshed causing great loss of Cattle
तर दुसरे शेतकरी श्री वासुदेव सिताराम शेंडे यांचे स्वतःच्या गोट्यातील जनावर रात्री ला बांधून होते अचानक पणे जनार्धन सीताराम शेंडे यांच्या गोट्याला आग लागली ती आग ऐवढी जबरदस्त होती कि लागूनच असलेले वासुदेव सिताराम शेंडे यांच्या पण गोट्याला घेरून त्यांच्या गोट्याला जबरदस्त आग लागली या आगीमध्ये शेती उपयोगी अवजारे, तसेच जनावराचे वैरण , तसेच त्यांचे बैलं गंभीर स्वरूपात जखमी झाली असून अंदाजे रुपये दीड ते दोन लाख रुपयाचे नुसकान झाले आहे. या घटने मुळे वरील आपती जण शेतकरी यांना शेती कशी करावी असे मोठे संकट डोळ्या समोर उभे थाटले आहे, शंकर बबन केदार यांच्या पण लागून असलेल्या गोट्याला आगीत सामावून त्या गोट्यातील जनावरचे वैरण, शेती उपयोगी अवजारे, रासायनिक खत तसेच जुण्या इमारतीचे लाकडी साहित्य आगीत खाक झाले असून अंदाजे 70,000 रुपये नुस्कान झाले.एक महिन्यापासून सतत चालू असलेल्या पावसामुळे पहिलेच शेतकरी संकटात सापडले असून त्यांच्या वर नैसर्गिक आपत्तीचा भर पडला आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment