वरोरा प्रतिनिधी :-आज दि 12,8 2024 रोज सोमवार ला शेकोटी मुळे गोट्याला लागलेल्या आगीत गोट्यात बांधलेल्या श्री वासुदेव सीताराम शेंडे यांचे बैल जखमी झाले तर जनार्धन सीताराम शेंडे यांचा एक बैल मूत्यू झाला तर काही जनावरे जखमी झाले, आणि शेती उपयोगी वस्तू आणि जनावरचे वैरण पूर्ण पणे जडले.तर संबंधित घटनेची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती तसेच विदमान संचालक श्री राजू भाऊ चिकटे हे शेतकरी यांच्या सोबत संकट काळी देवदूत म्हणून नेहमी अग्रेसर असे अनेक वेळा आपण बघितले मात्र आज पण तीच वेळ पुन्हा अमलात आणून पीडित शेतकरी यांना थेट गावाला जावून आर्थिक मदत केली.
या मदती मुळे आपती जनक शेतकरी यांना काहीसा दिलासा मिळाला आहे या वेळी श्री जनार्धन शेंडे शेतकरी, श्री वासुदेव शेंडे शेतकरी तर श्री राजू भाऊ चिकटे, कृषि उत्पन्न बाजार समिती माजी सभापती, सौ किरण नंदकुमार ढोक सरपंच पाचगाव ठा,श्री किशोर डुकरे सामाजिक कार्यकर्ते, श्री हरीश भाऊ जाधव श्री पिंटू भाऊ सातपुते, सचिन भोयर, श्री राजेश राठोड ग्रामसेवक, श्री गुरुदेव तळवेकर तलाठी पाचगाव, ड्रा सतीश अघळते साहेब पशु वैदकीय अधिकारी तसेच गावातील नागरिक हजर होते तसेच पीडित शेतकरी यांच्या पाठीशी उभे राहून कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पंचायत समिती मार्फत आर्थिक मदत मिळवून देणार अशी ग्वाही दिली
0 comments:
Post a Comment