घाटंजी प्रतिनिधी - गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अत्यल्प भावात विक्री करावा लागला होता. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला यामुळे शासनाने भाव फरक म्हणून हेक्टरी 5000 हजारांची मदत जाहीर केली परंतु शासनाच्या कामचुकार अधिकाऱ्यांनी तालुक्यातील किमान अर्ध्या शेतकऱ्यांची नावे शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीतून वगळले आहे.
Half of the farmers in the taluka Ghatanji disappeared from the subsidy; Farmers strike at Tehsil office
विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे सर्व रेकॉर्ड शासना जवळ आहे. बँकेचे खाते , सातबारा, आधार लिंक, उपलब्ध आहे तरी कृषी विभागाकडून अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करायला सांगितल्या जात आहे. हे अतिशय निंदनीय असून केवळ तुटपुंज्या पैशासाठी शेतकऱ्यांचा छळ करणे सुरू आहे याचा निषेध करण्यासाठी आज घाटंजी तहसीलवर शेकडो शेतकरी धडकले होते. सदर विषयाचे निवेदन घाटंजीचे नायब तहसीलदार श्री मेंढे यांना देण्यात आले. आठ दिवसात महसूल आणि कृषी विभागाने एकत्र बसून यादिचा घोळ संपवावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी शेतकरी नेते मोरेश्वर वातीले यांनी केली.निवेदन देताना माजी सभापती मानिकराव मेश्राम, अनंत चौधरी, अरविंद चौधरी, अरविंद जाधव, पांडुरंग मासुलकर,नंदु तुमराम, विष्णू धुर्वे, मधुकर घोडाम, सुनिल कोरवते, रविंद्र मोहजे, सह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment