Ads

भद्रावती येथे 'आपले निसर्ग, पर्यावरण व आपले आरोग्य' यावर जनजागृती कार्यक्रम

जावेद शेख प्रतिनिधी (भद्रावती):- स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर स्थानिक इनरव्हील क्लब व इकोप्रो यांच्या संयुक्त विद्यमाने येथील लोकमान्य विद्यालयाच्या प्राणांगात आपले निसर्ग पर्यावरण व आपले आरोग्य या विषयावर जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .
या कार्यक्रमाला प्रमुख वकत्ते म्हणून प्रख्यात पर्यावरणवादी मा. बंडू धोत्रे होते .यावेळी उपस्थिताना निसर्ग पर्यावरण व आपले आरोग्य या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
Public awareness program on 'Our Nature, Environment and Our Health' at Bhadravati
यावेळी उपस्थितांनी सुद्धा प्रश्न विचारून मानवी जीवनात येत असलेल्या आरोग्य विषयी समस्यांचे निराकरण कशाप्रकारे करायचेअसे अनेक प्रश्न मांडण्यात आले यावर बंडू धोत्रे यांनी यावर विस्तृत असे मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेमा पोटदुखे, सूत्रसंचालन सुनिता खंडाळकर , तर उपस्थित त्यांचे आभार जयश्री बलीनवार यांनी मानले .
या कार्यक्रमाला वर्षा धानोरकर, तृप्ती हिरादेवे, केशीनी हटवार, विश्रांती उराडे, शुभांगी बोरकुटे, स्नेहा कावडे, मनीषा ढुमणे, लता टिकरे, रश्मी बिसेन, कविता सुपी ,शेंडे मॅडम आदींसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक व रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment