Ads

22 वर्षीय तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

चंद्रपूर:- जिल्ह्यातील बल्लारपूर शहर बल्लारपूर कलामंदिर संकुलातील पेपरमिल गेटसमोर भीषण अपघात झाला. त्यात मोपेड क्रमांक MH 34 AW 6107 ला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने त्यात स्वार गोलू राजू उमरगुंडावार 22 रा. घोडपेठ भद्रावती यांचा जागीच मृत्यू झाला.
A 22-year-old youth died in a horrific accident
तर मागे बसलेले सतीश अशोक लोखंडे 34 रा. घुघुस हा गंभीर जखमी असून त्याच्यावर बल्लारपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोलू उमरगुंडावार हे चंद्रपूरहून बल्लारपूर येथे बहिणीच्या घरी जात असताना हा अपघात झाला. या प्रकरणाची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन जखमी सतीशला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. गोलूच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह तपासणीसाठी बल्लारपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment