Ads

महाराष्ट्र स्टेट सिलांबम (लाठी काठी) चॅम्पियनशिप 28 व 29 सप्टेंबर ला भद्रावती मध्ये

भद्रावती जावेद शेख :- प्राचीन भारतीय पारंपारिक मार्शल आर्ट्स क्रिडा प्रकाराना प्रसारित करून गुणवत्तापूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवरचे स्पर्धक निर्माण करण्याच्या उद्दशानेच केंद्र सरकारने- खेलों इंडिया या प्लॅटफॉर्म ला निर्माण केलेले आहे. या खेलो इंडिया भारत सरकार द्वारा मान्यताप्राप्त सिलांबम ( लाठी काठी, तलवार,भाला, इत्यादी भारतीय पारंपारिक शस्त्र स्पर्धा क्रीडा प्रकारांचा आपल्या विदर्भ विभाग मधे नियोजित विकास व प्रसार करण्याच्या एकमात्र उद्देशाने सिलांबम स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलांबम असोसिएशन Silambam Sports Association of Maharashtra and Chandrapur District Amateur Silambam Associationच्या संयुक्त विद्यमानाने भव्य महाराष्ट्र स्टेट सिलांबम चॅम्पयनशिप दिनांक 28 व 29 सप्टेंबर 2024 ला आशीर्वाद मंगल कार्यालय,भद्रावती,चंद्रपुर येथे करण्यात आलेले आहे
असे स्पर्धा मुख्य आयोजक मास्टर दुर्गराज एन रामटेके ( विदर्भ विभाग प्रमुख - सिलांबम स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र,पुणे) यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे.

सन 2006 पासुन महाराष्ट्र मध्ये सर्वप्रथम सिलांबम या प्राचीन भारतीय पारंपारिक मार्शल आर्ट्स क्रिडा प्रकाराची शुरुवात करणारे इंटरनॅशनल कोच,रेफरी सिलांबम एक्स्पर्ट मास्टर संजय बनसोडे सर(पुणे) यांच्या तांत्रीक मार्गद्शनाखाली आयोजीत या भव्य महाराष्ट्र स्टेट लेव्हल सिलांबम स्पर्धेत राज्यातील संलग्न विविध जिल्हा सिलांबम असोसिएशन चे जवळपास 250 विद्यार्थी खेळाळु सहभागी होणार आहेत.
या भव्य महाराष्ट्र राज्स्तरीय सिलांबम स्पर्धा च्यां यशस्वी आयोजनासाठी चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलांबम असोसिएशन चे पदाधिकारी वसदस्य शितल रामटेके, बी एल करमनकर करण डोंगरे, सॅम मानकर, संदीप पंधरे,क्रिश भोस्कर,संजय माटे, प्राविण्य पाथरर्डे, सिनु रामटेके , आकाश वाघामारे, सुरज मेश्राम,यश सोरते, शंभु वाघमारे,गौतम भगत इत्यादी कठीण प्रयास करीत आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment