जावेद शेख भद्रावती- युनिशन्स इंडिया लिमिटेड यांच्या स्थापना दिवसानिमित्त आयुध निर्माणी चांदा येथे निर्मित झालेल्या दारूगोळा उत्पादनाची भव्य प्रदर्शनी दिनांक १ व २ ऑक्टोबरला सार्वजनिक सभागृह आयुध निर्माणी चांदा भद्रावती येथे करण्यात येणार आहे.
आयुध निर्माणी येथील दारूगोळा उत्पादन प्रदर्शनीचे उद्घाटन मुख्य महाप्रबंधक विजयकुमार यांच्या हस्ते दिनांक १ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे त्यानंतर सायंकाळी ६ वाजल्यापासून प्रदर्शनी चालू करण्यात येईल दिनांक २ ऑक्टोंबरला सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रदर्शनी चालू ठेवण्यात येणार आह. या प्रदर्शनीमध्ये आयुध निर्माणी येथे निर्माण केलेल्या बारूद , मिसाइल , रॉकेट ,टॅंक सह विदेशात जाणाऱ्या गोलाबारूचे प्रदर्शन करण्यात येणार आह. जिल्ह्यातील विद्यालय , महाविद्यालयातील विद्यार्थी नागरिकांनी ही प्रदर्शनी x लाभ घ्यावा असे आव्हान कनिष्ट कार्यशाळा प्रबंधक प्रदिप राजुरकर यांनी केले आहे
0 comments:
Post a Comment