चंद्रपूर- सर्वानी संघटित व्हावे यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरवात केली. तेव्हा पासून महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्तानाच नव्हे तर हिंदुस्ताना बाहेर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे यामध्ये दुबई देखील मागे नाही .सातासमुद्रापार दुबई यंदा प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव
यंदा इन्सपायर इवेंट्स आणि दुबईतील विविध सामाजिक संघटना, कंपन्या, आमरोली योग पीठ, सांस्कृतिक मंडळ व मित्र परिवार यांनी दुबई येथे प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय एकत्रितपणे घेतला आहे. वेस्टझोन प्लाझा हाँटेल, अपार्टमेंट कुवैत स्ट्रीट ,मनखुल दुबई शनिवारी सात सप्टेंबर रोजी सकाळी श्रीमंत ढोलताशे पथकांच्या वारणा मध्ये गणरायाचे आगमन आणि प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर दिवसभर भजन व सामुहिक गणेश जाप ,दुपारी आरती, सांस्कृतिक कार्यक्रम, संध्याकाळी आरती आरती गणेश भजन व जागरण हे कार्यक्रम होतील. रविवारी आठ सप्टेंबरला गणेश पूजन, आरती, सामुहिक गणेश जाप,संस्कृती मराठी मंडळाचे सामुहिक अर्थवशीर्ष पठन. संध्याकाळी आरती आणि ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक गणेश विसर्जन व सांगता आरती होणार असल्याचे माहिती डॉ. शिल्पा अमृतलाल चन्ने यांनी दिली .
0 comments:
Post a Comment