Ads

डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराचा‌ हजारो नागरिकांनी घेतला लाभ.


सादिक थैम वरोरा-चला बदल घडवुया या उपक्रमा अंर्तगत डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतु टेमुर्डा येथे दिनांक ८ सप्टेंबर २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले.
Thousands of citizens benefited from the eye examination and glasses distribution camp.
तालुक्यात फ्लोराइड युक्त पाणी , वाढत्या कोळसा खदानीमुळे दूषित कोळशाचे कण , मोबाईल पाहण्याचे वाढते प्रमाण यामुळे डोळ्यांचे आजार वरोरा भद्रावती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढले असून गेल्या कित्येक वर्षापासून स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हजारोच्या संख्येने नागरिकांना हा आजार वाढला असून येणाऱ्या काळात लहान बालक, युवक , महिला सुद्धा डोळ्याच्या आजाराने ग्रस्त होऊ शकतात अशी चिंता डॉक्टरानी व्यक्त केली.

त्यामुळे या क्षेत्रात काम करत असताना वरोरा क्षेत्रातील टेमुर्डा, मांगली, जामणी,आसाळा, बेलगाव, आटमुर्डी, पिजदुरा, पिंपळगाव,बांद्रा व परीसरातील हजारो नागरिकांचे डोळे तपासून त्यांना पुढील आरोग्य सल्ला देत. मोफत तपासणी करून घेतली. यावेळी परिसरातील १३४२ नागरीकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मोतीबिंदू, डोळे लाल येणे, सुजन, असे बरेचसे आजार नागरिकांमध्ये दिसून आले.
वरोरा तालुक्यात नेत्रतज्ञांची कमी असून गाव खेड्यांमध्ये प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर खुटेमाटे यांनी स्वतःचीच ओपीडी सुरू केल्याने गावकऱ्यांना सुखद आश्चर्याचा धक्काच लागला आहे.
यावेळी डॉ.खुटेमाटे यांनी स्पष्ट केले , की चांगल्या गोष्टीसाठी शिक्षित उमेदवार विधानसभेचा उमेदवार असला पाहिजे. ज्या माणसाला प्राथमिक गरजांची पूर्तता तरी करता आली पाहिजे. असा जनसेवक येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
मागील बऱ्याच वर्षापासून डोळ्याचे मोफत शिबिर राबवीत आहे. तरीसुद्धा गरिबांना वीस ते तीस हजार देऊन मोतीबिंदूचे ऑपरेशन करावे लागते ही खेदाची गोष्ट आहे.
त्यामुळे चला बदल घडवूया या संकल्पने अंतर्गत प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर खुटेमाटे यांनी विधानसभा स्वतः लढवून गरिबांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.चेतन खुटेमाटे , उद्घाटक जर्नादन पा.देठे प्रमुख पाहुणे म्हणून सुचिता ठाकरे, विलास झिले डाॅ.अमित झिले राजु तिखट,प्रकाश विरुटकर, लहू ठक,सुनिता आत्राम, वैशाली दरेकर, निलीमा इंगोले, ताराचंद खिरटकर,पुष्पाकर खेवले, माणिक बोबडे,पावडे सर हे मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक कामेश कुरेकार, संचालन चंद्रशेखर झाडे,आभार प्रदर्शन अनुप खुटेमाटे यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदृष्टी नेत्रालय ची सर्व टिम बोधी दारुंडे, आतिश तुमसरे,पवन बावणे,समिर झाडे,समिर जाधव, सुरज वाकडे,कुणाल तुमसरे,शुभम सोनुने,मोहीत कुंडलकर, सागर दोहतरे,प्रविण वासेकर, सावित्री बाई फुले कन्या विद्यालयाचे कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment