जिवती :- तालुक्यातील पुडियाल मोहदा येथील जिल्हा परिषद शाळेलगत असलेले शेतकरी कृषी केंद्र व बाजूलाच असलेल्या केंद्रचालक यांच्या घराला सोमवारी सायं ६.३० च्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.ही आग त्यांच्याच घरातील गॅसच्या गळतीमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
Agricultural center and house at Pudial Mohda burnt down in fire
आग लागल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने या भीषण आगीत शेतकरी कृषी केंद्र व बाजूलाच लागून असलेले कृषी केंद्र चालकाचे घर जळून खाक झाले आहे.
पुडियाल मोहदा येथे वास्तव्यास असलेले शेतकरी अंगद शिवाजी गुट्टे यांचा कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय आहे. सोमवारी सायं ६.३० च्या सुमारास घरात पत्नी एकटी असताना ती देव्हाऱ्यात दिवा लावत असताना, त्यावेळी आधीच संपुर्ण घरात गॅसची गळती झालेली असल्यामुळे भीषण आग लागली. आग लागल्याबरोबर पत्नी कशीबशी बाहेर पडली. ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच दुकानातील विक्रीसाठी असलेले शेतीपयोगी साहित्य,खत, कीटकनाशके, फर्निचर आणि २० हजार रुपये रोख रक्कम तसेच घरातील फ्रिज, बेड, व इतर संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.
सदर घटनेची माहिती नगर पंचायत येथील अग्निशमन दलाला देण्यात आली परंतु अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहचे पर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले. या आगीत जवळपास ७.५० लाखांचे नुकसान झाल्याचे कृषी केंद्र चालक अंगद गुट्टे यांनी सांगितले.
0 comments:
Post a Comment