चंद्रपुर :- गणेशाची मूर्ती भव्य असल्याने ती जटपूरा गेटमध्ये अडकली होती. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी रात्री तीन वाजता येथे पोहोचत प्रशासनाला बाजूची बॅरिकेटींग काढायला लावून गणपतीचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर गणेश भक्तांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले.
काल मोठ्या उत्साह आणि जल्लोषात लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. मात्र, गंज वॉर्ड येथील युवक गणेश मंडळाची मूर्ती अतिशय भव्य असल्यामुळे ती जटपूरा गेटच्या आतून निघण्यास अडचण निर्माण झाली. पोलिस प्रशासनाने गणेश मूर्ती बाजूला ठेवून मूर्ती परत नेण्याची विनंती मंडळाला केली. परंतु मंडळ पदाधिकाऱ्यांनी याला नकार दिला.
यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री तीन वाजता आमदार किशोर जोरगेवार यांना माहिती दिली. आमदार जोरगेवार स्वतः जटपूरा गेट येथे पोहोचले. त्यांनी सर्व परिस्थिती समजून घेत बाजूची बॅरिकेटींग मोकळी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर गणेशाची मूर्ती जटपुरा गेटच्या बाजूने नेण्यात आली. रात्री तीन वाजता उपस्थित राहून निर्माण झालेल्या समस्येचे निराकरण करणाऱ्या आमदार किशोर जोरगेवार यांचे गणेश मंडळ आणि भक्तांनी विशेष आभार मानले.
0 comments:
Post a Comment