Ads

आरटीओच्या स्कोर्पिओ गाडीची दोन गाईला जोरदार धडक,एकीचा जागीच मृत्यू

चंद्रपूर :- एरवी वाहतुकीचे नियम पालन करण्याचे धडे देणाऱ्या आरटीओ विभाग हाच आता सुरक्षेच्या कारणावरून चर्चेचा विषय बनलेला आहे .सुट्टीच्या दिवशी रविवारला अवैध वसुली करिता निघालेल्या MH04KR6434 या स्कोर्पिओ गाडीने घोडपेठ जवळ दोन गाईना जोरदार धडक दिल्याने एकीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गाय सुद्धा मृत्युंच्या दारात असल्याची खळबळजनक घटना सायंकाळी घडली असून गाय मालकांना भद्रावती पोलीस स्टेशनं मध्ये नेऊन धमकावण्याचा प्रकार आरटीओ निरीक्षक व कर्मचारी यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.
RTO's Scorpio car hit two cows hard, one died on the spot
वरील आरटीओच्या स्कोर्पिओ गाडीने त्या गाईना एवढी जोरदार धडक दिली की त्या धडकीत स्कोर्पिओ गाडीचे समोरचे टप्पर व लाईट सुद्धा फुटले आहे, ह्या आरटीओच्या स्कोर्पिओ गाडीने वरोरा भद्रावती तालुक्यात धुमाकूळ घातला असून ट्रक व इतर गाड्यांचा पाठलग करणे व त्या गाडी चालकाकडून चिरीमिरी घेऊन गाड्या सोडून देणे हेच काम सुरु आहे, अगोदरच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांची ईडी चौकशीची मागणी चर्चेत असून आता त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या निरीक्षकांना त्यांनी अवैध वसुली करिता खुली सूट दिली का याची शंका आहे. आता या शेतकऱ्यांच्या गाईच्या नुकसानीची भरपाई कोण देणारं? आरटीओ मोरे देणारं की मग ते निरीक्षक देणारं हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

भद्रावती पोलीस स्टेशन मध्ये सेटलमेंट करिता चर्चा

दोन गाईना धडक दिल्याचं प्रकरण अंगलट येईल या भीतीने भद्रावती पोलीस स्टेशन येथे गाई मालक यांना बोलावून सेटलमेंट करण्यासाठी आरटीओ अधिकारी आले असून गाय मालकावर ते दबाव ताकत असल्याची माहिती आहे, दुसऱ्यांना गाडी हळू चालवा हे सांगणारे आरटीओ अधिकारी स्वतःचं नियमांच उल्लंघन करत असतील व ब्रेकर समोर आहे हे माहीत असतांना 90 च्या स्पीड ने गाड्या धावत असतील तर अशा अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, दरम्यान आरटीओ च्या या अपघातात गाई ठार झाल्याने शेतकरी संतापले असून यासाठी आता घोडपेठ परिसरातील शेतकरी आंदोलन पण करेल अशी माहिती आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment